- News
- पॉलिटिक्स
- दानवे-शिरसाटांमध्ये पुन्हा वाक्युद्ध सुरू!, दानवे म्हणाले, झुकेंगा नही साला..., शिरसाट म्हणाले, हसं...
दानवे-शिरसाटांमध्ये पुन्हा वाक्युद्ध सुरू!, दानवे म्हणाले, झुकेंगा नही साला..., शिरसाट म्हणाले, हसं करून घेताहेत...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महापालिका निवडणुकीतही ठाकरे गटाचे आ. अंबादास दानवे आणि शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांच्यात वाक्युद्ध सुरू झाले आहे. ठाकरे गटाच्या उमेदवारांना उमेदवारी मागे घेण्यासाठी धमकावले जात असल्याचा आरोप आ. दानवे यांनी केला. त्यावर मंत्री शिरसाट यांनी ‘ठाकरे गटाला उमेदवारच मिळत नव्हते. अशा उमेदवारांना कोण आणि कशासाठी धमकावणार?’ असे प्रत्युत्तर दिले.
आ. अंबादास दानवे यांनी ‘एक्स’वर झुकेंगा नही साला’, अशी टॅगलाइन व्टिट केली. ते म्हणाले, की ठाकरे गटाच्या उमेदवांना मंत्री धमकावत असून दबाव आणत आहेत. मंत्रीच नव्हे तर प्रशासनातील अधिकारीही उमेदवारी मागे घेण्यासाठी फोनाफोनी करत आहेत. निवडणुकीत ही पद्धत पहिल्यांदाच पाहतोय, असा आरोप आ. दानवे यांनी केला. आमच्याकडेही खाते पुस्तक आहे. हिशेब ठेवला जाईल आणि व्याजासह परतफेड नक्की करू. आपले काम आणि नितीमत्ता विसरणाऱ्यांचा बाजार उठवू, असा इशाराही आ. दानवे यांनी दिला.
मंत्री शिरसाट यांचे प्रत्युत्तर...
ठाकरे गटाला उमेदवार मिळत नव्हते. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणूक अधिकारी कार्यालयासमोर बसून त्यांनी पक्षाचे बी फॉर्म येईल त्याला दिले. अशा उमेदवारांना कोण आणि कशासाठी धमकावणार? दानवे यांचे व्टिट हास्यास्पद आहे. असे करून ते आपलेच हसे करून घेत आहेत, असे मंत्री शिरसाट म्हणाले.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
07 Mar 2026 10:15:36
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : धरण उशाला अन् कोरड घशाला ही म्हण दर उन्हाळ्यात छत्रपती संभाजीनगरकरांच्या बाबतीत खरी ठरते....

