शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा सिडको पोलीस ठाण्यात ठिय्या

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्यावर अतिशय खालच्या शब्दांत टीका केली. पाटील यांच्या वडिलांचा उल्लेख करत पातळी सोडली. पडळकर यांच्या वक्‍तव्‍याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पडळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या (शरद पवार) पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सिडको पोलीस ठाण्यात गुरुवारी (१८ सप्‍टेंबर) रात्री ठिय्या दिला.

सिडको पोलिसांनी कार्यकर्त्यांना समजावले, की पडळकर यांनी जेथे वक्तव्य केले, तेथे तक्रार अर्ज वर्ग केला जाईल. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, प्रदेश सरचिटणीस सलीम शेख, राजेश पवार, शहर कार्याध्यक्ष आशिष पवार, विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष सुशील बोर्डे, जिल्हाध्यक्ष भूषण तांबे, प्रदेश सचिव प्रकाश इंगळे यांनी आंदोलनात भाग घेतला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश

Latest News

आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार पुन्हा गोत्यात येण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या शेवटच्या जाहीर...
भरधाव पिकअप वाहनाने स्कुटीला उडवले, मायलेकी जखमी, छत्रपती संभाजीनगर शहराजवळील घटना
सत्यनारायण पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
झाडावरून पडून युवकाचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
शिंदे गटाला सोबत घ्यावेच लागणार, पण ‘अटींचा’ भडीमार नको म्हणून भाजपच्या खेळ्या सुरू..., शहर-जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे काय म्हणाले...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software