जागा वाटपात युतीचे घोडे अडणार?; सावेंनी शिंदे गटाला दिला इशारा, म्हणाले..., जाणून घेऊ ‘मनपा पॉलिटिकल अपडेट’

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत जागा वाटपावरून भाजप-शिंदे गटात चांगलेच ताणले जाणार असल्याचे चित्र आहे. शिंदे गटाचा फॉर्म्यूला भाजपला अमान्य आहे. त्यामुळे शिंदे गट काय भूमिका घेतो, हे पाहणे आता रोमांचक ठरणार आहे.  गुरुवारी (१८ डिसेंबर) इच्‍छुकांच्या मुलाखती घेतल्यानंतर भाजप मंत्री अतुल सावे यांनी शिंदे गटाला स्पष्टच इशारा दिला. शिंदे गटाचा २०१५ चा फॉर्म्यूला अमान्य असून, फिफ्टी-फिफ्‍टी जागा वाटप करण्याबाबत एकमत झाले तरच युती होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. या इशाऱ्याबरोबरच भाजप एक पाऊल मागे आल्याचीही चर्चा आहे. कारण भाजपचे एकूणच राजकीय बळ पाहता शिंदे गटाला भाजपपेक्षा कमी जागा दिल्या जातील, अशी चर्चा होती. मात्र सावे यांनी फिफ्टी-फिफ्‍टी जागांबद्दल बोलून एकप्रकारे शिंदे गटाला काही अंशी दिलासा दिला आहे.

स्थानिक पातळीवर युतीबद्दल तोडगा निघाला नाही तर प्रदेश कार्यालयाकडे युतीचा निर्णय सोपवला जाईल, असे सावे म्हणाले. शिवसेनेतील फुटीवर कोणतेही भाष्य न करता सावे यांनी ‘भाजप आता खूप पुढे निघून गेला आहे,’ असे म्हटले आहे. आमदार, खासदार, मंत्र्यांची मुले, बहीण, मुली महापालिका निवडणुकीत उतरत आहेत, तुमचीही मुले निवडणूक लढणार का, असे विचारले असता सावे म्हणाले, की माझी मुले निवडणुकीत वॉररूम आणि बॅक ऑफीस सांभाळतील, असे ते म्हणाले. नेत्‍यांच्या नातलगांबद्दल सर्वानुमते निर्णय होईल, असे त्यांनी सांगितले.

अजित पवार गटाला हव्यात ३५ जागा...
महायुतीमध्ये अजित पवार गटाला ३५ जागा वाटाघाटीतून मिळाव्यात, अशी अपेक्षा आहे. तसा प्रस्ताव त्यांनी भाजपसमोर ठेवला आहे. अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अभिजीत देशमुख, प्रा. सुनील मगरे, दत्ता भांगे आणि भाजपचे माजी महापौर बापू घडमोडे, प्रशांत देसरडा, समीर राजूरकर यांच्यात जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे रिपाइं आठले गटानेसुद्धा भाजपकडे १५ जागा मागितल्या असून, त्यात हा तिढा कसा सुटेल, हे पाहणे रोमांचक राहणार आहे.

पॉलिटिकल अपडेट...
१.छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत एमआयएम पक्ष बसपाला सोबत घेण्याच्या विचारात आहे. एमआयएमची आधी वंचित बहुजन आघाडीसोबत युती होती. पण स्वतःचा फायदा करून घेत एमआयएमने नंतर वंचितकडे दुर्लक्ष केले. आता बसपासोबत काय प्रकार घडतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
२.महाविकास आघाडीत अद्याप जागा वाटपाची चर्चाही सुरू झालेली नाही. सुरुवात कुठून करायची, असा पेच बहुधा मविआतील सर्व पक्षांसमोर पडला आहे. ठाकरे गटाची काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेससोबत अद्याप चर्चा झाली नाही, असे आ. अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. ठाकरे गटाकडे ८८ जागांसाठी इच्‍छुकांनी उमेदवारी मागितल्याने दानवे म्हणाले.
३.महापालिका निवडणूक लढविण्यासाठी महापालिकेतील चतुर्थश्रेणी कर्मचारी गणेश पवार यांनी नोकरीचा बुधवारी राजीनामा दिला. प्रशासनाने लगेच राजीनामा मंजूर केला. ते क्रीडा विभागात कार्यरत होते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ

Latest News

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहर व जिल्ह्यात मुस्लिम बांधवांची संख्या मोठी आहे. मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मास म्हणून ओळखल्या...
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
जमिनीच्या वादातून सेवानिवृत्त वनअधिकाऱ्याचे भरदिवसा अपहरण करून लुटले, ७ तास धरले वेठीस, छत्रपती संभाजीनगरची खळबळजनक घटना
सिल्लोडजवळ २ भीषण अपघात : अज्ञात वाहनाची कारला मागून धडक, एकाचा मृत्‍यू; मका नेणारा ट्रक उलटून चालक जखमी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software