रांजणगाव शेणपुंजीत सरपंच बदलाच्या हालचाली गतिमान!; १४ सदस्य लोणावळ्याच्या सहलीवर, नव्या सरपंच १७ ऑगस्टला शपथ घेणार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : वाळूज एमआयडीसीतील मोठे आर्थिक उत्पन्न असलेल्या रांजणगाव शेणपुंजी ग्रामपंचायतीत सरपंच बदलाच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. महिनाभरापासून तशा हालचाली सुरू होत्या. आता त्याला गती आली असून, १७ ऑगस्टला नवीन सरपंच कविता बाबुराव हिवाळे यांच्या शपथविधीची तयारी केली जात आहे. सध्याच्या सरपंच योगिता महालकर यांचा सर्वानुमते राजीनामा मंजूर झाल्यानंतर पुढील नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. उरलेल्या केवळ तीन महिन्यांच्या काळासाठी सरपंच बदलाचा डाव रंगणार आहे.

रांजणगाव शेणपुंजी ग्रामपंचायतीत एकूण १७ सदस्य आहेत. ऐनवेळी काहीही होऊ शकते, सदस्य फुटू शकतात म्हणून १४ सदस्यांना लोणावळा परिसरातील एका गुप्त ठिकाणी सहलीच्या नावाखाली नेण्यात आल्याची माहिती मेट्रोपोलिस पोस्टच्या हाती लागली आहे. उरतलेले ३ सदस्य विरोधी गटाचे आहेत. १४ सदस्यांच्या पॉलिटिकल पिकनिकचा खर्च कोण उचलत आहे, याबद्दल मात्र चर्चा सुरू झाली आहे.
ग्रामपंचायतीची ओळख केवळ महसुली बळावर नाही, तर येथे अनेक औद्योगिक प्रकल्प, भूखंड करार, पायाभूत सुविधा आणि स्थानिक विकास निधीच्या माध्यमातून दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल असल्याने सरपंच पद हे प्रभावी मानले जाते. सध्याच्या सरपंच योगिता महालकर यांच्या राजीनाम्याला बाह्य दबाव होता, की अंतर्गत पातळीवरील असंतोष याबाबत मात्र दोन्ही बाजू मौन बाळगून आहेत. काहींच्या मते, एका मोठ्या राजकीय नेत्यामार्फत नेतृत्व बदलाचा प्लॅन आखला गेला. हे संपूर्ण सत्तापालट एकमताने ठरल्याची अधिकृत नोंद असली तरी प्रत्यक्षात किती सहमती आणि किती रणनीती, याचे उत्तर वेळच देईल.

कविता बाबुराव हिवाळे या स्थानिक राजकारणातील नव्या पिढीतील चेहरा मानल्या जात आहेत. त्यांचा कार्यकाळ तीन महिन्यांपुरताच असला तरी भावी  निवडणुकांसाठी आपली छाप उमटवण्याची त्यांची शक्यता तपासली जाते आहे. त्यांच्या समर्थकांच्या मते, हा फक्त शपथविधी नव्हे, तर पुढील राजकीय आखाड्यातील पहिली एन्ट्री आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीच्या कारभारावर गावकऱ्यांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. आकस्मिक राजीनामा, सदस्यांची ‘सहली’ आणि शपथविधीपूर्व गुप्त हालचाली यामुळे प्रशासन, विकासकामे, खर्च मंजुरी आणि निर्णय प्रक्रियेवर पुढील तीन महिन्यांत काय परिणाम होणार, याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. काही नागरिक सध्याच्या घडामोडींवर नाराजी व्यक्त करत असून, निवडणुकांच्या तोंडावर सुरू असलेल्या ‘सत्ता व्यवस्थापनाला’ गांभीर्याने घेतले पाहिजे, अशी मागणीही व्यक्त केली जात आहे. १७ ऑगस्टला गावच्या राजकारणात होणाऱ्या या नव्या ‘३ महिन्यांच्या सम्राज्ञी’च्या कारभाराकडे सर्वांचे लक्ष लागले असून, या पदासाठी पडद्यामागील पत्ते कसे खेळले जातात याकडेही रसिकतेने पाहिले जात आहे. पुढील निवडणुकांचे ‘दिग्दर्शन’ इथून सुरू झाल्याची जाणीव स्थानिकांना आधीच झाली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ

Latest News

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहर व जिल्ह्यात मुस्लिम बांधवांची संख्या मोठी आहे. मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मास म्हणून ओळखल्या...
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
जमिनीच्या वादातून सेवानिवृत्त वनअधिकाऱ्याचे भरदिवसा अपहरण करून लुटले, ७ तास धरले वेठीस, छत्रपती संभाजीनगरची खळबळजनक घटना
सिल्लोडजवळ २ भीषण अपघात : अज्ञात वाहनाची कारला मागून धडक, एकाचा मृत्‍यू; मका नेणारा ट्रक उलटून चालक जखमी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software