सोबत कोण अन् शत्रू कोण... कळत नसल्याने मनसैनिक सैरभैर, पण छत्रपती संभाजीनगरात ५८ जागी लढण्याची केली तयारी!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : विधानसभेला एकाची साथ तर लोकसभेला दुसऱ्याचाच प्रचार केलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आता स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक उंबरठ्यावर येऊन ठेपलेली असतानाही संभ्रमात आहेत. या वेळी सोबत कोण आणि शत्रू कोण यावरून ते गोंधळात असले तरी पक्षाच्या छत्रपती संभाजीनगरमधील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मात्र शहरात ५८ जागी लढण्याची तयारी केल्याचे सांगण्यात येत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. अगदी परवापर्यंत एकमेकांवर टीका करणारे उद्धव आणि राज ठाकरे सध्या गळ्यात गळा घालून फिरत असल्याने या निवडणुकीला या दोघांचेही पक्ष एकत्र सामोरे जातील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. पण या आघाडीतील अन्य पक्ष राज यांना सोबत घ्यायला तयार नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक फक्त उद्धव सेनेच्या साथीने लढायची की महाविकास आघाडीच्या सहकार्याने याबाबत मनसैनिक सध्यातरी संभ्रमात आहेत.

शिवाय विधानसभा निवडणुकीत वेगळ्याच भूमिकेत असलेल्या राज ठाकरे यांनी लोकसभेला मात्र छत्रपती संभाजीनगरातील आपल्या सैनिकांना संदीपान भुमरे यांचा प्रचार करण्याचा आदेश दिला होता. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाताना मात्र पक्षाची नेमकी भूमिका काय असणार, सोबत कोण आणि शत्रू कोण या सगळ्यांबाबत राज यांनी अजूनही भूमिका स्पष्ट केली नाही. यामुळे मनसैनिकांचा गोंधळ वाढतच चालल्याचे सध्या तरी दिसत आहेत.

प्रतीक्षा राज ठाकरेंच्या आदेशाची...
पक्षाच्या शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मात्र निवडणुकीला सामोरे जाण्याची सगळी तयारी करून ठेवल्याचा दावा केला आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी तसे संकेतही दिले आहेत. विशेषत: पक्षाने छत्रपती संभाजीनगर शहरावर अधिक लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे. शहरातील सुमारे ५८ वॉर्डांत उमेदवार उभे करण्याची आम्ही तयारी करून ठेवली आहे, असे खांबेकर यांनी म्हटले आहे. दुसरीकडे पक्षाचे कार्यकर्ते मात्र या निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांचा आदेश नेमका कधी येतो याच्या प्रतीक्षेत आहेत. मतदारयाद्यांच्या दुरुस्तीच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांचा एक नोव्हेंबरला मुंबईत मोर्चा असून, यानंतर राज ठाकरे भूमिका स्पष्ट करून आपल्याला नेमका आदेश देतील, अशी अपेक्षा पक्षाचे शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

ओढणीने हात-पाय बांधून तरुणीवर बलात्कार, १९ वर्षीय तरुणाला २ किमी पाठलाग करून पकडले!; कन्नड तालुक्यातील खळबळजनक कारवाई

Latest News

ओढणीने हात-पाय बांधून तरुणीवर बलात्कार, १९ वर्षीय तरुणाला २ किमी पाठलाग करून पकडले!; कन्नड तालुक्यातील खळबळजनक कारवाई ओढणीने हात-पाय बांधून तरुणीवर बलात्कार, १९ वर्षीय तरुणाला २ किमी पाठलाग करून पकडले!; कन्नड तालुक्यातील खळबळजनक कारवाई
कन्नड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : तरुणीचे हात-पाय बांधून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या १९ वर्षीय तरुणाला कन्नड तालुक्यातील नागदजवळील महादेव...
असेही खंडणीखोर... मजुराचे अपहरण करून मागितली १५ हजारांची खंडणी!; २४ तासांतही जेरबंदही झाले!! वैजापुरातील घटनेची राज्यभर चर्चा
मुख्य जलवाहिन्यांवरील १ हजारांहून अधिक अवैध नळ कनेक्शन तोडणार!; महापालिकेने मोहीम आखली, मुहूर्त कधी लागणार?
ऑर्केस्ट्रामध्ये काम, खासगी कंपनीत नोकरी... आयुष्याशी संघर्ष हरला २९ वर्षीय तरुण!; चौका घाटात घेतला गळफास, पैठण, वैजापूर तालुक्यातही मजूर, शेतकऱ्याची आत्महत्या
लाचखोर पोलीस अंमलदाराला ४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा!, छत्रपती संभाजीनगर सत्र न्यायालयाचा आदेश
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software