ओढणीने हात-पाय बांधून तरुणीवर बलात्कार, १९ वर्षीय तरुणाला २ किमी पाठलाग करून पकडले!; कन्नड तालुक्यातील खळबळजनक कारवाई

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

कन्नड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : तरुणीचे हात-पाय बांधून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या १९ वर्षीय तरुणाला कन्नड तालुक्यातील नागदजवळील महादेव टाका परिसरात पोलिसांनी बुधवारी (४ मार्च) सकाळी साडेअकराच्या सुमारास अटक केली. हर्षल रमेश परदेशी (वय १९, रा. बोरमळी-नागद, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) असे अटक केलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे.

नाशिक शहरातील सिडको परिसरात राहणाऱ्या तरुणीशी हर्षलची ओळख होती. तक्रारीनुसार, २२ फेब्रुवारीला रात्री तरुणी तिच्या घरात झोपलेली असताना घरात इतर कोणीही नसल्याचे पाहून हर्षलने तिथे प्रवेश केला. त्याने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. तरुणीला त्याला विरोध केला असता हर्षलने तिच्याच ओढणीच्या तिचे हात आणि पाय बांधून टाकले. त्यानंतर तिच्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले, असा आरोप आहे. बलात्कार केल्यानंतर त्याने तरुणीच्या गालावर चापट मारली आणि या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास जीवे ठार मारेन, अशी धमकी देत तो पसार झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

तरुणीने अंबड (नाशिक शहर) पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी हर्षलविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला होता. नाशिक स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना त्याचे लोकेशन कन्नड तालुक्यातील नागद परिसरात असल्याचे बुधवारी समजले. त्यांनी तातडीने नागदचे बीट जमादार प्रदीप पवार यांच्याशी संपर्क साधला. जमादार पवार यांनी तपासाची चक्रे फिरवली. गुप्त बातमीदाराकडून हर्षल हा महादेव टाका परिसरात असल्याची माहिती मिळाली. बुधवारी सकाळी साडेअकराला तिथे धडक दिली. पोलिसांना पाहून हर्षलने पळ काढला. मात्र पवार यांनी दोन किलोमीटर त्याचा पाठलाग करून पकडलेच. अटकेनंतर त्याला नाशिक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

ओढणीने हात-पाय बांधून तरुणीवर बलात्कार, १९ वर्षीय तरुणाला २ किमी पाठलाग करून पकडले!; कन्नड तालुक्यातील खळबळजनक कारवाई

Latest News

ओढणीने हात-पाय बांधून तरुणीवर बलात्कार, १९ वर्षीय तरुणाला २ किमी पाठलाग करून पकडले!; कन्नड तालुक्यातील खळबळजनक कारवाई ओढणीने हात-पाय बांधून तरुणीवर बलात्कार, १९ वर्षीय तरुणाला २ किमी पाठलाग करून पकडले!; कन्नड तालुक्यातील खळबळजनक कारवाई
कन्नड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : तरुणीचे हात-पाय बांधून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या १९ वर्षीय तरुणाला कन्नड तालुक्यातील नागदजवळील महादेव...
असेही खंडणीखोर... मजुराचे अपहरण करून मागितली १५ हजारांची खंडणी!; २४ तासांतही जेरबंदही झाले!! वैजापुरातील घटनेची राज्यभर चर्चा
मुख्य जलवाहिन्यांवरील १ हजारांहून अधिक अवैध नळ कनेक्शन तोडणार!; महापालिकेने मोहीम आखली, मुहूर्त कधी लागणार?
ऑर्केस्ट्रामध्ये काम, खासगी कंपनीत नोकरी... आयुष्याशी संघर्ष हरला २९ वर्षीय तरुण!; चौका घाटात घेतला गळफास, पैठण, वैजापूर तालुक्यातही मजूर, शेतकऱ्याची आत्महत्या
लाचखोर पोलीस अंमलदाराला ४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा!, छत्रपती संभाजीनगर सत्र न्यायालयाचा आदेश
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software