यंत्रणेच्या चुकांवर आयुक्तांचे पांघरुण, जी. श्रीकांत म्हणाले, ऐनवेळच्या गोंधळापेक्षा आजचा गोंधळ बरा! २५ हजार मतदारांची नावे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेल्याची कबुली

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महापालिका निवडणूक विभागातील यंत्रणेच्या चुकांवर आयुक्‍त जी. श्रीकांत यांनी चक्क पांघरुण घातल्याचे मंगळवारी (२ डिसेंबर) दिसून आले. ऐनवेळच्या गोंधळापेक्षा आजचा गोंधळ बरा. चुकीने २५ हजार मतदारांची नावे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेल्याची कबुली देताना त्यांनी ते दुरुस्त करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. मतदार याद्या शुद्ध राहतील, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे जी. श्रीकांत म्हणाले. हा घोळ घालणाऱ्या दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांना एकप्रकारे त्यांनी पाठिशी घातल्याचेच दिसून येत आहे.

मतदार याद्यांवर आजवर तब्बल ४ हजार ३४४ आक्षेप दाखल झाले आहेत. १९०४ आक्षेप निकाली काढले असून, २१०५ आक्षेपांवर अद्याप काम सुरू असल्याचे सांगून जी. श्रीकांत म्हणाले, की ११ लाख मतदारांची फोड करताना काही मतदार नजरचुकीने अलीकडच्या प्रभागात किंवा पलीकडच्या प्रभागात दर्शविले गेले. आपल्याकडे दुरुस्तीसाठी वेळ आहे. युद्धपातळीवर दुरुस्ती केली जात आहे. प्रभाग २६ मधील मतदारांनी मोर्चा काढण्याचा इशारा दिला. मात्र अद्याप सूचना, हरकती व आक्षेप दाखल करण्याची संधी आहे. त्यानंतरही सुधारणा झाली नाही तर नागरिकांनी मोर्चा काढण्याची भाषा करावी, असे जी. श्रीकांत म्हणाले.

रावसपुरा ग्रामपंचायतीचे काही गट महापालिकेच्या हद्दीत येतात. माजी सैनिक कॉलनी महापालिका हद्दीत आहे. त्यामुळे तेथील नावे महापालिकेच्या प्रभागातच राहतील. उर्वरित काही गट महापालिकेच्या हद्दीत दर्शवले असतील तर शहनिशा केली जात आहे. शासनाकडून शहर अभियंता आणि मुख्य अग्‍निशमन अधिकारी भरण्यासाठी प्रस्ताव पाठवल्याची माहितीही त्यांनी दिली. छत्रपती संभाजीनगर शहरात प्रथमच प्रभाग रचनेनुसार निवडणूक होत असल्याने आणि त्यातल्या त्यात अनुभवी अधिकारी, कर्मचारी नसल्याने त्यांनी बराच घोळ घालून ठेवल्याचे दिसून येते. तो निस्तरताना, चुकांवर पांघरूण घालताना आयुक्‍तांना प्रयत्न करावे लागत आहे. बुधवारी (३ डिसेंबर) आक्षेप दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!

Latest News

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले! विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विट्स हॉटेल चौकातून देवगिरी कॉलेजकडे जाणाऱ्या रोडवर लुटारू सापळा लावून थांबलेले असतात. एकटेदुकटे कुणी...
UPSC मध्ये नवीन भरती सुरू, २ लाख रुपयांपर्यंत पगार, नोकऱ्यांसाठी पात्रता जाणून घ्या...
CUET PG करिता रजिस्ट्रेशन सुरू, परीक्षा मार्चमध्ये होणार, या गोष्टी लक्षात ठेवा...
१७,००० रुपयांच्या नोकरीवर मारली लाथ, आता वर्षाकाठी १७ लाखांची करताहेत उलाढाल!
३ दिवसांपासून पोटात अन्न-पाण्याचा कण नाही, वडगाव कोल्हाटीत उपोषणकर्त्या महिलांची प्रकृती बिघडली, डॉक्टर म्हणाले, उद्या आणखी बिकट होईल स्थिती...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software