- News
- पॉलिटिक्स
- नवव्या बैठकीतही सुटला नाही छत्रपती संभाजीनगरातील जागावाटपाचा पेच, महायुतीचा चेंडू आता फडणवीस-शिंदेंच...
नवव्या बैठकीतही सुटला नाही छत्रपती संभाजीनगरातील जागावाटपाचा पेच, महायुतीचा चेंडू आता फडणवीस-शिंदेंच्या कोर्टात!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : नवव्या बैठकीतही जागा वाटपाचा पेच न सुटल्याने अखेर भाजप आणि शिंदे गटाच्या कोअर कमिट्यांनी हा निर्णय आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोर्टात ढकलला आहे. आज, २७ डिसेंबरला सकाळी १० ते दुपारी ४ अशी ६ तास बैठक चालली. मंत्री अतुल सावे, मंत्री संजय शिरसाट, खा.डॉ. भागवत कराड, खा. संदिपान भुमरे यांच्यासह कोअर कमिट्यांचे सदस्य हजर होते. पण जागा वाटपावर शिक्कामोर्तब होऊ शकले नाही. मोठ्या दबावाखाली बैठक सुरू झाली, तशीच संपली.
१. प्रारंभी शिंदे गटाने २०१५ चा फॉर्म्यूला पुढे केला होता. त्यानुसार ३८ जागांवर शिंदे गटाने दावा केला होता. भाजपला २३ जागा आणि उरलेल्या जागांचे समान वाटप अशी भूमिका शिंदे गटाने घेतली होती.
२.भाजपचे मंत्री अतुल सावे यांनी फिफ्टी- फिफ्टीचा फॉर्म्यूला मांडला होता.
३.भाजपने भूमिका बदलत ५५ जागांवर दावा सांगत ३३ जागा शिंदे गटाने लढवाव्यात असे म्हटले.
४.शिंदे गट जास्त जागा मागत असल्याने पेच कायम असल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रत्येक प्रभागातून भाजप आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका निवडणुकीची तयारी केली आहे. महायुती झाल्यास पक्षाचे तिकीट मिळणार नसल्याने अनेकांचा हिरमोड होणार आहे. गेल्या काही दिवसांत भाजप, शिंदे गटात अनेकांनी प्रवेश केला आहे. तेही नगरसेवकपदाचे तिकीट मिळणार असल्याच्याच आमिषाने आले आहेत. त्यामुळे आधीच इच्छुक, त्यात पडलेली भर यामुळे तिकीट वाटप करताना दोन्ही पक्षांची चांगलीच गोची होणार आहे. अनेकांनी तर प्लॅन बी तयार ठेवला आहे. भाजप, शिंदे गटाकडून तिकीट मिळाले नाही तर ठाकरे गट किंवा अन्य पक्षांकडून तिकीट मिळविण्याची तयारी त्यांनी केली आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
महाशिवरात्री कधी आहे? शिवपूजेचा शुभ मुहूर्त, पूजेची पद्धत जाणून घ्या...
By City News Desk
वाळूज एमआयडीसीतील हॉटेलमध्ये युवकाच्या आत्महत्येने खळबळ
By City News Desk
दानपेटीत चुकून वस्तू पडल्यास विसरा; परत मिळणार नसल्याचा तुळजाभवानी संस्थानचा अजब फतवा!; भाविकांत संताप
By Bhalchandra Pimpalwadkar
Latest News
22 Jan 2026 08:18:53
रोहित शेट्टीच्या गोलमाल मालिकेतील भाग ४ (गोलमाल अगेन) मधील एक दृश्य खूप प्रसिद्ध आहे. या दृश्यात चित्रपटात वसुली भाईची भूमिका...

