- News
- सिटी क्राईम
- पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात सहायक फौजदाराने पीडितेच्या पतीला कानशिलात वाजवल्याचा आरोप, जोरात फटका बसल्य...
पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात सहायक फौजदाराने पीडितेच्या पतीला कानशिलात वाजवल्याचा आरोप, जोरात फटका बसल्याने जमिनीवर कोसळला... व्हायरल व्हिडीओचे सत्य काय..?
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : लैंगिक अत्याचाराची तक्रार घेऊन पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात आलेल्या पीडित तरुणीच्या पतीच्या कानशिलात सहायक फौजदाराने लगावली. जोरात फटका बसताच तो जमिनीवर कोसळला. नंतर पोलिसांनीच त्याला घाटी रुग्णालयात नेले. या धक्कादायक प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. घटनेचे सत्य काय आहे, हे मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राने जाणून घेतले असता, पोलीस निरीक्षक अशोक भंडारे यांनी सांगितले, की तरुणीच्या पतीने कर्तव्यावर असलेल्या पोलिसांशी अवाजवी हुज्जत घातली. याच दरम्यान त्याला अचानक फीट आल्याने पोलिसांनीच त्याला सरकारी वाहनातून घाटीत नेल्याचे सांगितले. दरम्यान, पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फूटेज तपासल्यास सत्य समोर येईल, असे महिलेच्या पतीने म्हटले आहे.
पीडित २२ वर्षीय तरुणीचा तिच्या पतीसोबत वाद सुरू आहे. पोटगीचा दावा दाखल करण्यासाठी तिची ओळख ॲड. किशोर गायकवाड (वय २९, रा. चौका, फुलंब्री) याच्याशी झाली. मात्र पुढे पती-पत्नीमधील वाद मिटला. त्यानंतर तरुणीने केस बंद करण्यास वकिलाला सांगितले. मात्र, वकिलाने फीचे उर्वरित २० हजार रुपये मागितले. पैसे नसल्याचे सांगितल्यावर त्याने १६ जानेवारी २०२६ रोजी तिच्या घरात शिरून पैशांच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी केली. त्याने बळजबरीने अत्याचार केला. इतकेच नव्हे तर, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर १३ व १६ फेब्रुवारी रोजी पुन्हा अत्याचार केल्याचे तक्रारीतून समोर आले आहे. हा प्रकार वाढतच चालल्याने तरुणीने पतीसह पुंडलिकनगर पोलीस ठाणे गाठले होते. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
तरुणी व तिचा पती पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले असता पोलीस अंमलदाराकडे तरुणीने आपबिती मांडली. या वेळी पोलीस आणि तरुणीच्या पतीत शाब्दिक चकमक झाली. आरोपानुसार, सहायक फौजदाराने तरुणीच्या पतीच्या कानशिलात मारली. फटका इतका जोरात होता, की तरुणीचा पती जमिनीवर कोसळला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
विहिरीत पडून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, पिशोर येथील दुर्दैवी घटना
By City News Desk
Latest News
13 Mar 2026 11:02:27
खुलताबाद (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : खुलताबाद पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती पदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या गटाने चक्क भाजपला साथ दिली. ही...

