समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहराजवळील गांधेली येथे मंगळवारी (१० मार्च) रात्री ९ च्या सुमारास हभप निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर ५० ते १०० समाजकंटकांच्या जमावाने हल्ला चढवून अमानुष मारहाण केली. चर्चेसाठी आधी महाराजांना बाहेर बोलावले, पण ते बाहेर येताच जमाव तुटून पडला. महाराजांसह त्यांच्या आई, वडिलांनाही मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे शहरभर संतापाची लाट उसळली आहे. महाराजांनी कीर्तनात केलेल्या विधानावरून हा वाद सुरू झाल्याचे सांगण्यात येते.

घटनेबाबत पत्रकारांशी बोलताना निवृत्ती महाराज म्हणाले, की विधानाबद्दल मी माफीही मागितली होती. तरीही समाजकंटकांनी घरावर हल्ला केला. मी जे वक्तव्य केले होते, त्याला कायदेशीर मार्गाने जाऊ शकत होते. मात्र त्यांनी कायदा हातात घेऊन समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. ५० ते १०० जणांचा जमाव आला. त्यांनी आधी घराची कडी वाजवली. त्यावेळी माझे वडील बाहेर गेले. ते माझ्याशीच चर्चा करायची, असे म्हणत होते. मी सकाळी भेटतो, असा निरोप पाठवूनही त्यांनी केवळ बोलायचे आहे, असे म्हणून बाहेर बोलावले. बाहेर येताच मारहाण करायला सुरुवात केली. माझ्या जिवाला धोका निर्माण झाला असून, पोलीस आणि सरकारने त्यादृष्टीने पावले उचलावीत, अशी मागणीही महाराजांनी केली.

चिकलठाणा पोलीस काय म्हणाले...
दरम्यान, हा वाद चिकलठाणा पोलीस ठाण्यापर्यंत गेला होता. तिथेही महाराजांनी संबंधितांची माफी मागितली. त्यावेळी प्रकरण आणखीन वाढेल म्हणून पोलिसांनीच महाराजांना तक्रार करू नका, असे सांगितल्याचे पत्रकारांशी बोलताना महाराज म्हणाले. मात्र ज्या प्रकारे धमक्या येत आहेत आणि मारहाणीची घरावर हल्ला करून मारहाण झाली आहे, ती बाब अत्यंत गंभीर असून, महाराजांना सुरक्षा पुरविण्याची मागणी होत आहे.
कशामुळे वाद...
अलीकडेच निवृत्ती महाराज वाडेकर यांनी एका महिलेच्या वक्तव्याचा समाचार कीर्तनातून घेतला होता. काही दिवसांपूर्वीच चंद्रग्रहण लागले होते. या चंद्रग्रहणादरम्यान एका गर्भवती महिलेने पालेभाज्या, फळे चिरून खात या सर्व अंधश्रद्धा असल्याचा संदेश दिला होता. निवृत्ती महाराजांनी, ती महिला आपल्या धर्माची नव्हती, त्यामुळे तिला आपल्या धर्मावर आक्षेप घेण्याचा मुळीच अधिकार नाही, अशी टिप्पणी केली होती.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट

Latest News

समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहराजवळील गांधेली येथे मंगळवारी (१० मार्च) रात्री ९ च्या सुमारास हभप निवृत्ती...
सोशल मीडियातून ओळख, प्रेम, ४ महिने सहवास, नंतर जातीवरून युवतीला लाथाबुक्क्या!; प्रियकरासह त्याची आई, दोन बहिणी, भावाविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’, पाचोडची घटना
भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना
नापिकी, कर्जबाजारीपणाचे आणखी २ बळी!; सिल्लोड, कन्नड तालुक्यातील २ शेतकऱ्यांनी कवटाळले मरण!!
फीट येऊन चुलीवर पडल्याने महिलेचा मृत्यू, सातारा परिसरातील संत ज्ञानेश्वरनगरातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software