छत्रपती संभाजीनगरच्या उद्योजकांना उद्योगमंत्र्यांनी केले आश्वस्त, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे अधिकार वापरण्याची केली सूचना, उद्योजकांशी बोलताना काय म्हणाले...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : इराण-इस्त्रायल युद्धामुळे केंद्र सरकारने कमर्शियल गॅसचा पुरवठा बंद केला. गॅसअभावी छत्रपती संभाजीनगरमधील अनेक कंपन्या बंद पडण्याच्या मार्गावर असल्याने या बिकट परिस्थितीचा आढावा उद्योगमंत्री सामंत यांनी उद्योजकांकडून गुरुवारी (१२ मार्च) रात्री जालना रोडवरील हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये घेतला. या आढाव्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

उद्योजकांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीपसिंग पुरी यांची भेट घेण्यात येईल. मुख्यमंत्र्यांना याविषयी अहवाल देण्यात येईल, असे मंत्री सावंत म्हणाले. बैठकीसाठी विभागीय आयुक्त डॉ. जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, ऑरिकचे व्यवस्थापकीय संचालक पी. डी. मलिकनेर, एमआयडीसीचे सहसंचालक डॉ. विजय राठोड, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, भारत पेट्रोलियमचे क्षेत्रीय व्यवस्थापक मनोजकुमार यादव तसेच विविध उद्योग संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते. उद्योग चालवण्यासाठी लागणाऱ्या गॅसचा तुडवडा, पर्यायी इंधन व्यवस्थेवर या वेळी चर्चा करण्यात आली. भारत पेट्रोलियम कंपनीचे विभागीय व्यवस्थापक मनोज यादव यांनी त्यांच्या कंपनीकडून वाळूज आणि शेंद्रा ऑरिक येथे पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा सुरू असल्याचे सांगितले. तेव्हा मागेल त्यांना गॅस देण्याचे निर्देश उद्योगमंत्र्यांनी यादव यांना दिले.

साठेबाजांवर कडक कारवाई करा...
साठेबाजी, काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. उद्योगांना इंधन उपलब्धतेसाठी तत्काळ गॅस पुरवठा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे अधिकार वापरावे, अशी सूचनाही मंत्री सावंत यांनी केली. बांबूपासून गॅस तयार करण्याच्या सूचना उद्योजकांना करत तर बांबू लागवडीसाठी एमआयडीसीच्या खुल्या जागा उद्योजकांना देण्याची घोषणाही मंत्र्यांनी केली. उद्योग बंद पडणार नाहीत,  यासाठी आम्ही प्रयत्नरत असून, सरकार उद्योजकांच्या पाठिशी असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

खुलताबादमध्ये सत्ता हातून गेल्याने आ. चव्हाणांचा तिळपापड!; भाजप-ठाकरे गटाच्या युतीवर म्हणाले, आम्ही बांगड्या घालून बसलो नाही...

Latest News

खुलताबादमध्ये सत्ता हातून गेल्याने आ. चव्हाणांचा तिळपापड!; भाजप-ठाकरे गटाच्या युतीवर म्हणाले, आम्ही बांगड्या घालून बसलो नाही... खुलताबादमध्ये सत्ता हातून गेल्याने आ. चव्हाणांचा तिळपापड!; भाजप-ठाकरे गटाच्या युतीवर म्हणाले, आम्ही बांगड्या घालून बसलो नाही...
खुलताबाद (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : खुलताबाद पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती पदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्‍या गटाने चक्‍क भाजपला साथ दिली. ही...
बायको दारू पिण्यासाठी पैसे देत नाही म्हणून नवऱ्याने घर दिले पेटवून!, सिल्लोडची घटना
पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात सहायक फौजदाराने पीडितेच्या पतीला कानशिलात वाजवल्याचा आरोप, जोरात फटका बसल्याने जमिनीवर कोसळला... व्हायरल व्हिडीओचे सत्य काय..?
मित्राच्या घरात आढळला युवकाचा संशयास्पदस्थितीत मृतदेह, बिडकीनजवळील घटनेने खळबळ
छत्रपती संभाजीनगरच्या उद्योजकांना उद्योगमंत्र्यांनी केले आश्वस्त, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे अधिकार वापरण्याची केली सूचना, उद्योजकांशी बोलताना काय म्हणाले...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software