११ लाख ग्राहक, २० हजार सिलिंडर्सची रोजची गरज, ७७ गॅस एजन्सी, ऑनलाइन बुकिंग सेवा बंद... छत्रपती संभाजीनगरमध्ये काय आहे घरगुती गॅस सिलिंडरचे चित्र...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमधील घरगुती गॅस सिलिंडरबद्दल शहरवासिय अतिघाबरलेले असल्यानेच टंचाईसदृश्य चित्र निर्माण झाल्याचे समोर येत आहे. एका दिवसात बुकिंगसाठी ४० हजार म्हणजेच नियमितपेक्षा दुप्पट कॉल येत असल्याने ऑनलाइन बुकिंग यंत्रणा ठप्प झाली आहे. लोक आगाऊ बुकिंग करून ठेवत आहेत. मात्र ज्यांनी २५ दिवसांपूर्वी गॅस सिलिंडर घेतले, त्यांनाच गॅस सिलिंडर देण्यात येणार असून, आगाऊ कुणालाही दिले जाणार नाही, असे पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.

शहरात ११ लाख ७७ हजार ७४३ घरगुती गॅस सिलिंडर ग्राहक असून, रोज शहराला २० हजार १३० घरगुती सिलिंडर्स लागतात. ३ गॅस वितरक कंपन्यांकडून ७७ गॅस एजन्सीजना सिलिंडर पुरवठा होतो. नाशिकच्या एलपीजी गॅस डेपोतून छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस सिलिंडर येतात. सध्या शहरात व्यावसायिक गॅस सिलिंडरचा साठा संपला आहे. ज्यांनी साठेबाजी केली होती, त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा दराने व्यावसायिक गॅस सिलिंडर दिले जात आहे.

घरगुती ग्राहकांना सिलिंडर्सचा पुरवठा सुरळीत असल्याचा दावा केला जात असला तरी, गॅस एजन्सीजच्या समोर रांगा लागत आहेत. ९२१ रुपयांचे सिलिंडर २ हजार रुपयांत दिले जात असल्याचे आरोप होत आहे. हे कशामुळे घडत आहे, हे तपासण्यासाठी आता प्रशासनाने पावले उचलण्याची गरज आहे. प्रशासकीय सूत्रांच्या माहितीनुसार, गॅस एजन्सीकडील साठा आणि वितरण याची तपासणी पुरवठा विभागाने ११ पथकांकडून सुरू केली आहे. सध्या जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल वितरण सुरळीत सुरू आहे.

650714453_4374551472793231_41669 (1)

गॅस दरवाढीविरुद्ध काँग्रेसचे आंदोलन
केंद्र सरकारने एलपीजी गॅसच्या किमतीत वाढ केल्यामुळे सर्वसामान्य नागरिक, महिला, छोट्या व्यावसायिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. गॅसच्या किमती तत्काळ कमी कराव्यात, या मागणीसाठी काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी (१२ मार्च) सकाळी जोरदार निदर्शने केली. जिल्हाअध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहराध्यक्ष शेख युसूफ यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. आंदोलनात माजी आ. नामदेवराव पवार, प्रदेश पदाधिकारी अॅड. संदीप पाटील, जगन्नाथ काळे, माजी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब जगताप, संघटन महासचिव इंजि. विशाल बन्सवाल आदींची उपस्थिती होती

आणखी महत्त्वाच्या बातम्या

खुलताबादमध्ये सत्ता हातून गेल्याने आ. चव्हाणांचा तिळपापड!; भाजप-ठाकरे गटाच्या युतीवर म्हणाले, आम्ही बांगड्या घालून बसलो नाही...

Latest News

खुलताबादमध्ये सत्ता हातून गेल्याने आ. चव्हाणांचा तिळपापड!; भाजप-ठाकरे गटाच्या युतीवर म्हणाले, आम्ही बांगड्या घालून बसलो नाही... खुलताबादमध्ये सत्ता हातून गेल्याने आ. चव्हाणांचा तिळपापड!; भाजप-ठाकरे गटाच्या युतीवर म्हणाले, आम्ही बांगड्या घालून बसलो नाही...
खुलताबाद (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : खुलताबाद पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती पदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्‍या गटाने चक्‍क भाजपला साथ दिली. ही...
बायको दारू पिण्यासाठी पैसे देत नाही म्हणून नवऱ्याने घर दिले पेटवून!, सिल्लोडची घटना
पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात सहायक फौजदाराने पीडितेच्या पतीला कानशिलात वाजवल्याचा आरोप, जोरात फटका बसल्याने जमिनीवर कोसळला... व्हायरल व्हिडीओचे सत्य काय..?
मित्राच्या घरात आढळला युवकाचा संशयास्पदस्थितीत मृतदेह, बिडकीनजवळील घटनेने खळबळ
छत्रपती संभाजीनगरच्या उद्योजकांना उद्योगमंत्र्यांनी केले आश्वस्त, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे अधिकार वापरण्याची केली सूचना, उद्योजकांशी बोलताना काय म्हणाले...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software