- News
- पॉलिटिक्स
- वाद पेटला : खैरेंविरुद्ध रशीदमामू, सत्तारांविरुद्ध दानवे... सत्तारांनी दानवेंना डिवचले, खैरेंनी ‘माम...
वाद पेटला : खैरेंविरुद्ध रशीदमामू, सत्तारांविरुद्ध दानवे... सत्तारांनी दानवेंना डिवचले, खैरेंनी ‘मामूं’ना शिंगावर घेतलं! (व्हिडीओसह)
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी पुन्हा एकदा भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्यावर नाव न घेता टिकास्त्र सोडले. जो गाव सांभाळू शकत नाही, तो नेता देश, राज्य काय सांभाळेल, असा टोला त्यांनी लगावला. तर दुसरीकडे दोन दिवसांपूर्वी काँग्रेसमधून ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या माजी महापौर रशीद मामू यांच्या उमेदवारीला माजी खासदार चंद्रकांत यांनी कठोर विरोध केला आहे. त्यांना तिकीट मिळू देणार नाही, असे त्यांनी निःक्षून सांगितले.
दरम्यान, काँग्रेसचे माजी महापौर रशीद मामू यांनी आ. अंबादास दानवे यांच्या पुढाकाराने ठाकरे गटात प्रवेश केला. त्यामुळे माजी खासदार चंद्रकांत खैरे प्रचंड खवळले आहेत. त्यांनी आपण कोणत्याही परिस्थितीत रशीद मामू यांना तिकीट मिळू देणार नाही, असा निर्णय त्यांनी बोलून दाखवला. आज, २२ डिसेंबरला रशीद मामू हे खैरे यांची भेट घेण्यासाठी सेनाभवनावर आले होते. त्यावेळी खैरे संतापले. माझा तुला उमेदवारी देण्यास ठाम विरोध आहे. इथे का आलास, असे म्हणत खैरेंनी त्यांना जाण्यास सांगितले. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पत्रकारांशी बोलताना खैरे म्हणाले, की १६ जानेवारी १९८६ रोजी शिवसेनेने समान नागरी कायद्यासाठी पहिला मोर्चा काढला होता. या मोर्चावर दगडफेक घडवून आणण्यात रशीद मामू यांचा हात होता. आम्ही ती दगडं खाल्ली आहेत. अशा माणसाला पक्षात घेतल्याने हिंदूंची ५० हजार मतं कमी होतील. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कदाचित हा इतिहास माहिती नसावा, म्हणून अजाणतेपणी हा प्रवेश झाला असेल, असे खैरे म्हणाले. अंबादास दानवे यांनी आपल्याला कोणतीही कल्पना न देता रशीद मामू यांचा प्रवेश घडवून आणल्याचा आरोपही खैरे यांनी केला आहे. (बातमीसोबतचा व्हिडीओ पहा).
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
07 Mar 2026 10:15:36
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : धरण उशाला अन् कोरड घशाला ही म्हण दर उन्हाळ्यात छत्रपती संभाजीनगरकरांच्या बाबतीत खरी ठरते....

