आश्रमशाळेत घुसून महिला अधीक्षकांचे काढले छायाचित्र, जाब विचारल्याने गैरवर्तन, चिकलठाणा पोलिसांत गुन्हा दाखल

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका आश्रमशाळेच्या गोडाऊनमध्ये जात महिला अधीक्षकांचे छायाचित्र काढले. त्याबद्दल जाब विचारल्याने युवकाने गैरवर्तन करून शिवीगाळ केल्याचा आरोप महिला अधीक्षकाने लावला आहे. महिला अधीक्षकाच्या तक्रारीवरून विजेंद्र जाधव (रा. कचनेर) याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारीनुसार, शनिवारी (३० जानेवारी) दुपारी विजेंद्रने शाळेतील कार्यालयात येऊन मोबाइलमध्ये गोडाऊनची छायाचित्रे काढण्यास सुरुवात केली. याबाबत महिला अधीक्षकांनी त्याला हटकले. यातून त्यांच्यात वाद झाले. महिला अधीक्षकांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्यांचे छायाचित्र काढले. शिवीगाळ करून विनयभंग केला, असा आरोप महिला अधीक्षकाने लावला आहे. स्वतःची सुटका करून घेत त्या कार्यालयाबाहेर गेल्या. तेव्हा जाधवने शाळेबाहेर येत आरडाओरड करून पुन्हा शिवीगाळ करत धमकावल्याचा आरोप तक्रारीत केला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पैठणमध्ये भुमरे विरोधकांना रावसाहेब दानवेंचे बळ; वर्चस्व मोडीत काढण्याचा प्रयत्न!

Latest News

पैठणमध्ये भुमरे विरोधकांना रावसाहेब दानवेंचे बळ; वर्चस्व मोडीत काढण्याचा प्रयत्न! पैठणमध्ये भुमरे विरोधकांना रावसाहेब दानवेंचे बळ; वर्चस्व मोडीत काढण्याचा प्रयत्न!
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : लोकसभा निवडणुकीनंतर शांत असलेले भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार रावसाहेब दानवे यांची पैठणमधील...
विद्यापीठाकडून पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात : भरधाव ऑटोरिक्षा नादुरुस्त टेम्पोला धडकली, २ ठार, २ गंभीर जखमी
मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये उड्डाणापूर्वी तांत्रिक बिघाड, छत्रपती संभाजीनगरची घटना
राठोड, काळे, चव्हाण अन्‌ मुलतानी... सोयगावच्या दोन गटांत रंगली राजकीय वारसांमध्ये लढाई!; मतदार कोणाच्या पाठिशी राहणार?
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software