- News
- जिल्हा न्यूज
- बाजारसावंगी गटात प्रशांत बंब, सतीश चव्हाण यांच्यासह डोणगावकरांचीही प्रतिष्ठा पणाला, पण घडणार व्टिस्ट...
बाजारसावंगी गटात प्रशांत बंब, सतीश चव्हाण यांच्यासह डोणगावकरांचीही प्रतिष्ठा पणाला, पण घडणार व्टिस्ट...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
खुलताबाद (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : तालुक्यातील जिल्हा परिषदेचा बाजारसावंगी गट भारतीय जनता पक्ष राखणार की राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसचा उमेदवार या वेळी बाजी मारणार, याकडे खुलताबाद -गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे. येथे आपल्याच पक्षाचा उमेदवार निवडून यावा, यासाठी भाजपचे आमदार प्रशांत बंब, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. असे असले तरी या गटातून जिल्हा परिषदेचा सदस्य कोण असेल याचा फैसला ८ हजार मुस्लिम मते घेतील, असे उघडपणे बोलले जात आहे.
बाजारसावंगी गटात बाजारसावंगी आणि टाकळी राजेराय हे पंचायत समितीचे दोन गण आहेत. या दोन्ही गणांतही तिरंगी लढत होत आहे. यात बाजारसावंगी गणात भाजपकडून उषा काटकर, राष्ट्रवादीच्या अंजना साळुंके तर काँग्रेसतर्फे सागर काटकर हे नशीब आजमावत आहेत. टाकळी राजेराय गणात भाजपचे देविदास भागडे, राष्ट्रवादीचे सुरेश जाधव आणि काँग्रेसचे सोहेल पटेल यांच्यात सामना होत आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
विद्यापीठाकडून पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर
By City News Desk
Latest News
03 Feb 2026 18:34:06
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : लोकसभा निवडणुकीनंतर शांत असलेले भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार रावसाहेब दानवे यांची पैठणमधील...

