चिकलठाणा एमआयडीसीत कामगारांवर टवाळखोरांचे हल्ले वाढले!; ड्युटीवरून घरी परतणाऱ्या कामगाराच्या मागून येत डोक्यात घातला लोखंडी पाईप

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : चिकलठाणा एमआयडीसीतील सुनसान रस्‍त्‍यांवर टवाळखोरांकडून कामगारांवर हल्ले वाढले आहेत. शनिवारी (३१ जानेवारी) रात्री साडेअकराच्या सुमारास एका कामगारावर टवाळखोराने मागून येत लोखंडी पाइपने हल्ला चढवला. यात कामगार जखमी झाला. भाऊसाहेब कारभारी चव्हाण (वय ४९, रा. केंब्रिज चौक बजरंगनगर चिकलठाणा परिसर) असे जखमी कामगाराचे नाव आहे.

चव्हाण हे चिकलठाणा एमआयडीसीतील पॅरासन कंपनीत नोकरी करतात. शनिवारी (३१ जानेवारी) रात्री साडेअकराच्या सुमारास ड्युटी संपल्याने घरी पायी चालत येत होते. सपना मॅट कंपनीकडून धूत हॉस्पिटलकडे पायी जात असताना सपना मॅटसमोर टवाळखोराने मागून येत त्यांना  लोखंडी पाईपने डोक्यात मारले. चेहऱ्यावर व कंबरेलाही लोखंडी पाईपचे वार केले. ते पाहून तिथून जाणाऱ्या रिक्षावाल्याने त्यांच्याकडे धाव घेतली. त्यामुळे टवाळखोर पळून गेला. चव्हाण यांनी सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी टवाळखोराविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याचा कसून शोध घेतला जात आहे. अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक विष्णू मुंढे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पैठणमध्ये भुमरे विरोधकांना रावसाहेब दानवेंचे बळ; वर्चस्व मोडीत काढण्याचा प्रयत्न!

Latest News

पैठणमध्ये भुमरे विरोधकांना रावसाहेब दानवेंचे बळ; वर्चस्व मोडीत काढण्याचा प्रयत्न! पैठणमध्ये भुमरे विरोधकांना रावसाहेब दानवेंचे बळ; वर्चस्व मोडीत काढण्याचा प्रयत्न!
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : लोकसभा निवडणुकीनंतर शांत असलेले भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार रावसाहेब दानवे यांची पैठणमधील...
विद्यापीठाकडून पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात : भरधाव ऑटोरिक्षा नादुरुस्त टेम्पोला धडकली, २ ठार, २ गंभीर जखमी
मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये उड्डाणापूर्वी तांत्रिक बिघाड, छत्रपती संभाजीनगरची घटना
राठोड, काळे, चव्हाण अन्‌ मुलतानी... सोयगावच्या दोन गटांत रंगली राजकीय वारसांमध्ये लढाई!; मतदार कोणाच्या पाठिशी राहणार?
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software