छत्रपती संभाजीनगरात पुन्हा पाडापाडी सुरू होणार, नगरसेवक मध्ये आले तर काय होणार, आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिला इशारा...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरात पुन्हा पाडापाडी सुरू होणार आहे. आणखी आठ रस्ते रूंद करणार असल्याचे महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी म्हटले आहे. अतिक्रमण हटविताना नगरसेवक किंवा त्यांच्या नातेवाइकांनी अडथळा केला तर त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस केली जाईल. अनधिकृत बांधकाम कुणाचेही असले तरी कारवाई केली जाईल, असा इशाराही जी. श्रीकांत यांनी दिला आहे.

महापालिकेने गेल्या वर्षी जून, जुलैमध्ये शहरात रस्ता रूंदीकरण मोहीम राबवत साडेपाच हजारांहून अधिक अतिक्रमणे जमीनदोस्त केली. रस्ता रूंदीकरण मोहीम थांबलेली नाही, असे जी. श्रीकांत यांनी यापूर्वीही सांगितले होते. सोमवारी (२ फेब्रुवारी) त्यांनी यासंदर्भात पोलिसांसोबत बैठक घेतली. महापालिकेतील विभागप्रमुखांसह पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर, रत्नाकर नवले बैठकीला उपस्थित होते. जी. श्रीकांत म्हणाले, की चंपा चौक ते जालना रोड, पैठण रोड ते विधि विद्यापीठ कांचनवाडी, दिल्ली गेट ते हर्सूल टी पॉइंट, हर्सूल टी पॉइंट ते सावंगी मनपा हद्द, सेव्हन हिल्स ते भाजीवाली बाई पुतळा, रेणुका माता परिसर साताऱ्याकडे जाणारा रस्ता, कांचनवाडी, नक्षत्रवाडी ते धुळे-सोलापूर महामार्ग या ८ डीपी रस्त्यांच्या रूंदीकरणासाठी मोहीम लवकरच सुरू केली जाईल.

त्याआधी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भूसंपादनाची रीतसर प्रक्रिया राबवली जाईल. रस्त्याचे टोटल स्टेशन (बाधित मालमत्तांचा नकाशा) करून घ्यावे, मालमत्ताधारकांना नोटिसा बजावण्यात याव्यात, त्यावर त्यांना म्हणणे मांडण्याची संधी द्यावी, कारवाईपूर्वी झोन अधिकारी, संबंधित पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपायुक्त रस्त्याचा आढावा घेतील. त्यानंतर प्रत्‍यक्ष कारवाई केली जाईल. कारवाईचे व्हिडीओ चित्रीकरणही केले जाणार आहे. ‘रस्ते मोकळे करण्याच्या मोहिमेची आगाऊ सूचना आठ दिवस अगोदर पोलीस प्रशासनाला द्यावी. जेणेकरून बंदोबस्त देण्याचे नियोजन होईल’, असे पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर आणि रत्नाकर नवले यांनी या वेळी जी. श्रीकांत यांना सांगितले.

निवडणुकीमुळे लागला होता ब्रेक
महापालिका निवडणुकीमुळे रस्ता रूंदीकरण मोहीम थांबली होती. पुढील आठवड्यात १० फेब्रुवारीला महापौर, उपमहापौरपदाची निवडणूकही होत आहे. त्यानंतर पुन्हा प्रशासन पाडापाडीच्या तयारीला लागणार असल्याचे चित्र दिसत आहे. नगरसेवकांचा अडथळा लक्षात घेता, कारवाईचा इशारा देऊन त्यांना गप्प बसविण्याचाही मनसुबा आयुक्तांना दिसून येतो. मनपाने यापूर्वी पाडापाडी केलेल्या पाच रस्त्यांसाठी डीपीआर (प्रकल्प आराखडा) तयार करण्याचे काम पेडेको संस्थेमार्फत सुरू असल्याचेही सांगण्यात आले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पैठणमध्ये भुमरे विरोधकांना रावसाहेब दानवेंचे बळ; वर्चस्व मोडीत काढण्याचा प्रयत्न!

Latest News

पैठणमध्ये भुमरे विरोधकांना रावसाहेब दानवेंचे बळ; वर्चस्व मोडीत काढण्याचा प्रयत्न! पैठणमध्ये भुमरे विरोधकांना रावसाहेब दानवेंचे बळ; वर्चस्व मोडीत काढण्याचा प्रयत्न!
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : लोकसभा निवडणुकीनंतर शांत असलेले भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार रावसाहेब दानवे यांची पैठणमधील...
विद्यापीठाकडून पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात : भरधाव ऑटोरिक्षा नादुरुस्त टेम्पोला धडकली, २ ठार, २ गंभीर जखमी
मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये उड्डाणापूर्वी तांत्रिक बिघाड, छत्रपती संभाजीनगरची घटना
राठोड, काळे, चव्हाण अन्‌ मुलतानी... सोयगावच्या दोन गटांत रंगली राजकीय वारसांमध्ये लढाई!; मतदार कोणाच्या पाठिशी राहणार?
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software