निराला बाजारमधील थरार : छातीवर बंदूक रोखली, गळ्याला चाकू लावला, पानटपरीचालकाला लुटले, ३ गुन्हेगारांच्या २ तासांत पोलिसांनी आवळल्या मुसक्या!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छातीवर बंदूक रोखून, गळ्याला चाकू लावत पानटपरीतून तिघांनी ७ हजार रुपये रोख व ६ हजारांच्या सिगारेट लुटल्या. हा थरार निराला बाजारच्या मुख्य चौकात रविवारी (१ फेब्रुवारी) सायंकाळी ६ ला घडला. शहर गुन्हे शाखेच्या पथकाने २ तासांतच लुटारूंच्या मुसक्या आवळल्या. त्यांना न्यायालयाने ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

जय कन्हैय्या भांडारकर (वय २३, रा. हनुमान मंदिरामागे, मोदी खाना, जालना), रितेश पारस पहाडिये (वय २५, रा. कुवारफल्ली, राजाबाजार, छत्रपती संभाजीनगर), करण गणेश तांदळे (वय २६, रा. दगडगल्ली, औरंगपुरा, छत्रपती संभाजीनगर) अशी अटक केलेल्या लुटारूंची नावे आहेत. त्यांचा चौथा साथीदार साहिल चांडक (वय २८, रा. दगडगल्ली, औरंगपुरा, छत्रपती संभाजीनगर) हा शहर सोडून पसार होण्यात यशस्वी झाला. निराला बाजारच्या मुख्य चौकात आशिष रामेश्वर काष्टे या युवकाची पानटपरी आहे. जय, करण, रितेश आणि साहील हे आशिषच्या परिचयाचे आहेत.

WhatsAppImage2026-02-02at5.15.22PM

साहिलने आधी आशिषला ५ हजार रुपये व सर्व सिगारेट देण्यास सांगितले. आशिषने नकार दिला असता साहिलने धमकावले. नंतर साहिलने तिघांना पैसे उकळण्यास सांगताच जय व करणने मारहाण केली. करणने आशिषच्या गळ्याला चाकू लावला तर जयने छातीवर पिस्तूल रोखून पानटपरीच्या गल्ल्यातून ७ हजार रुपयांची रोकड व ६ हजार रुपयांची सिगारेटची पाकिटे लुटली आणि पसार झाले. आशिषने त्याच्या मामाला घडलेला प्रकार सांगून क्रांती चौक पोलीस ठाण्यात धाव घेतली. या गंभीर गुन्ह्याची तातडीने गंभीर दखल घेत शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन कदम, अभिजित चिखलीकर यांनी सहकाऱ्यांसह युद्धपातळीवर शोध मोहीम हाती घेऊन तिन्ही लुटारूंना जेरबंद केले. त्यांच्याकडून पिस्तूल, जिवंत काडतूस व चाकू जप्त केला.

सोमवारी (२ फेब्रुवारी) न्यायालयात हजर केले असता तिघांनाही ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली, असे पोलीस उपनिरीक्षक अशोक इंगोले यांनी सांगितले. जय भांडारकर हा पोलीसपूत्र आहे. त्याचे वडील जालना पोलीस दलात कार्यरत आहेत. जुलै २०२५ मध्ये जालन्याच्या सदर बाजार पोलिसांनी अवैधरित्या पिस्तूल बाळगल्याच्या प्रकरणात त्याला अटक केली होती. जय व रितेशने पदमपुऱ्यात एप्रिल २०२४ मध्येही मध्यरात्री मैत्रिणीला कुणी त्रास दिला म्हणत एका तरुणाच्या डोक्याला पिस्तुल लावले होते. रितेशविरुद्ध २ तर करणविरुद्ध १ असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे यापूर्वी दाखल आहेत. करण पॅथॉलॉजी लॅबवर काम करतो. करणने जालन्यातील कुख्यात गुन्हेगार अमर गणेश पवारकडून पिस्तूल खरेदी केल्याचे पोलिसांना सांगितले. सध्या अमर हर्सूल कारागृहात आहे. तो मध्य प्रदेशहून पिस्तूल आणून २५ ते ४० हजारांत विकतो.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पैठणमध्ये भुमरे विरोधकांना रावसाहेब दानवेंचे बळ; वर्चस्व मोडीत काढण्याचा प्रयत्न!

Latest News

पैठणमध्ये भुमरे विरोधकांना रावसाहेब दानवेंचे बळ; वर्चस्व मोडीत काढण्याचा प्रयत्न! पैठणमध्ये भुमरे विरोधकांना रावसाहेब दानवेंचे बळ; वर्चस्व मोडीत काढण्याचा प्रयत्न!
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : लोकसभा निवडणुकीनंतर शांत असलेले भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार रावसाहेब दानवे यांची पैठणमधील...
विद्यापीठाकडून पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात : भरधाव ऑटोरिक्षा नादुरुस्त टेम्पोला धडकली, २ ठार, २ गंभीर जखमी
मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये उड्डाणापूर्वी तांत्रिक बिघाड, छत्रपती संभाजीनगरची घटना
राठोड, काळे, चव्हाण अन्‌ मुलतानी... सोयगावच्या दोन गटांत रंगली राजकीय वारसांमध्ये लढाई!; मतदार कोणाच्या पाठिशी राहणार?
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software