भुमरे पिता-पुत्राने केली गोची!; एकनाथ शिंदेंनी लावला डोक्याला हात!!, नक्की काय घडलं...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मुख्यमंत्रिपदाची खुर्ची गेली तेव्हा हंबरडा फोडला, खासदार पडले तेव्हा हंबरडा फोडला आणि विधानसभा निवडणुकीत आमदार पडले तेव्हा हंबरडा फोडला, आता आणखी किती वेळा हंबरडा फोडणार आहात, असा सवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करत उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. मात्र मात्र खासदार संदिपान भुमरे यांना बोलण्याच्या आवेशात काय बोलतोय हेच लक्षात आलं नसावं. त्यांनी एकनाथ शिंदेंना डोक्याला लावण्याची वेळ आणली. भाषणासाठी उभे राहिल्यावर भुमरे म्हणाले, की उद्धव ठाकरेंना हंबरडा मोर्चा काढण्याचा अधिकार नाही. कुणी काहीही म्हणो, हंबरडा आमच्या एकनाथ शिंदे साहेबांचा फुटणार...  दुसरीकडे त्यांचे पूत्र आ. विलास भुमरे यांनीही काही क्षण शिंदेंना चिंतित केले. ते म्हणाले, की निवडणुकीत २० हजार मतदान बाहेरून आणले. शिंदे यांनी त्यांच्यात वाक्यात सुधारणा केली. तुमच्या मतदारसंघातील पण बाहेर राहणारे असे तुम्हाला म्हणायचे आहे का, असे विचारल्यावर आ. भुमरेंना शाब्दिक चुकीमुळे गैरसमज होण्याची शक्यता लक्षात आली. त्यांनी लगेचच मतदारसंघातीलच पण बाहेरगावी राहणारे मतदानाच्या दिवशीच आणले, असा खुलासा केला.

त्याआधी खासदार भुमरे यांनी उद्धव ठाकरेंच्या हंबरडा मोर्चावर टीका करताना हंबरडा आता एकनाथ शिंदे साहेबांचा फुटणार, असे म्‍हणताच पालकमंत्री संजय शिरसाट यांनी चूक त्‍यांच्या लक्षात आणून दिली. त्यावर भुमरे यांनी लगेचच चूक सुधारत मला असे म्हणायचे आहे, की एकनाथ शिंदे साहेबांचाच बोलबाला राहणार... खासदार एकनाथ शिंदे यांना डोक्याला हात लावण्याची वेळ आली होती. छत्रपती संभाजीनगरातील संत एकनाथ रंगमंदिरात शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा झाला. उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, व्यासपीठावर मंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार रमेश बोरनारे, आमदार विलास भुमरे, आमदार संजना जाधव, माजी आमदार अण्णासाहेब माने, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांची उपस्थिती होती. मेळाव्याकडे माजी मंत्री सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी पाठ फिरवली. होर्डिंग्सवरही त्यांचे छायाचित्र नव्हते. मंत्री संजय शिरसाट यांच्याशी वाद असल्याने त्यांना मेळाव्याला बोलाविले नसल्याची चर्चा रंगली आहे. याआधीची बातमी : छत्रपती संभाजीनगरात भाजप-शिंदे गटाच्या स्वतंत्र जोरबैठका!; स्थानिक स्वराज्य संस्था निडणुका : ठाकरेंनी आरशात बघितले तर मोर्चा काढणार नाहीत : फडणवीस; ठाकरे आणखी किती काळ हंबरडा फोडणार? : शिंदे

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या

Latest News

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : केकत जळगाव (ता. पैठण) येथील अल्पभूधारक शेतकरी भास्कर बाबुराव मगर (वय ३५) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून...
प्रेम प्रकरणात मदत करत असल्याच्या संशयावरून तरुणावर लोखंडी रॉड, बेल्टने बेदम मारहाण, रोहिदासपुऱ्यातील घटना
दारूच्या नशेत मित्रानेच आवळला मित्राचा गळा!; खुनाचे गूढ २४ तासांत उकलले, बिडकीनजवळील पैठणखेड्याची घटना
Good News : शेंद्र्याजवळील जयपूर एमआयडीसीत महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनी १५० एकरवर साकारणार प्रकल्प!
बौद्ध समाजमंदिरावर चालवला जेसीबी!; पाडळसा उपसरपंचाचे कृत्य, गंगापूर तालुक्यातील खळबळजनक घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software