छत्रपती संभाजीनगरच्या पदवीधर मतदारांना नोंदणी करण्याचे आवाहन

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाची नव्याने मतदार यादी तयार करण्याचे कामकाज सुरू झाले असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांत पदवीधर मतदार ऑफलाईन पद्धतीने अर्ज वाटप व स्वीकृती करण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ यांनी कळविले आहे.

३० सप्टेंबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत पदवीधर मतदार हे ऑफलाईन किंवा ऑनलाईन मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करू शकता. नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे नमुना अर्ज क्र.१८ कोणत्याही विद्यापीठाचे पदवी प्राप्त केल्यापासून १ नोव्हेंबर २०२५ रोजी ३ वर्षे पूर्ण होणारा पदवीधर असणे आवश्यक आहे. पदवी प्रमाणपत्र किंवा पदवीच्या अंतिम वर्षाची मार्कशीट झेरॉक्स प्रत, पासपोर्ट साईज फोटो, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड यांची झेरॉक्स प्रत, पासपोर्ट साईज फोटो, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड यांची झेरॉक्स प्रत, नावात बदल असल्यास गॅझेट किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र व भरलेला फॉर्म नं. १८ वरील सर्व कागदपत्रांसह तहसील कार्यालयात सादर करता येईल.
मुख्या निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या कार्यालयाच्या वतीने मतदार यादीत नाव नोंदणीसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदार यांनी ऑनलाईन पद्धतीने मतदार नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
ऑनलाईन मतदार नोंदणीकरिता लिंक
https://mahaelection.gov.in/citizen/login या लिंक वर जाऊन आपली वैयक्तिक माहिती भरावयाची आहे. या लिंकवर मोबाईल ओटीपीद्वारे नोंदणी करून आवश्यक ती माहिती व कागदपत्रे अपलोड करून ऑनलाईन पद्धतीने मतदार यादीत नाव नोंदणी करता येईल. जिल्ह्यातील सर्व पात्र मतदारांनी औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाची रितसर नमुना नं. १८ पूर्णपणे भरून किंवा ऑनलाईन पोर्टलवरून नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या

Latest News

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : केकत जळगाव (ता. पैठण) येथील अल्पभूधारक शेतकरी भास्कर बाबुराव मगर (वय ३५) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून...
प्रेम प्रकरणात मदत करत असल्याच्या संशयावरून तरुणावर लोखंडी रॉड, बेल्टने बेदम मारहाण, रोहिदासपुऱ्यातील घटना
दारूच्या नशेत मित्रानेच आवळला मित्राचा गळा!; खुनाचे गूढ २४ तासांत उकलले, बिडकीनजवळील पैठणखेड्याची घटना
Good News : शेंद्र्याजवळील जयपूर एमआयडीसीत महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनी १५० एकरवर साकारणार प्रकल्प!
बौद्ध समाजमंदिरावर चालवला जेसीबी!; पाडळसा उपसरपंचाचे कृत्य, गंगापूर तालुक्यातील खळबळजनक घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software