विट्स, व्टिट अन्‌ रिट...आ. दानवे-मंत्री शिरसाटांमध्ये पुन्हा जुंपली!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरातील हॉटेल विट्स खरेदी प्रकरणावरून आ. अंबादास दानवे आणि मंत्री संजय शिरसाट यांच्यात पुन्हा जुंपली आहे. महापालिका निवडणुकीत ‘विट्स’ प्रकरणही चर्चेत आणण्याचा विरोधांचा प्रयत्न दिसत आहे.

काय म्हणाले आ. दानवे?
ज्या कार्यालयातून विट्स हॉटेल (धनदा कॉर्पोरेशन) गैरव्यवहार प्रकरणाच्या फायली फिरल्या, त्याच कार्यालयांचे अधिकारीच आता या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचा आदेश निघाला आहे. ही कसली ‘हाय पॉवर कमिटी'? देवेंद्र फडणवीसजी हे तर प्रकरणावर स्पष्टपणे पांघरूण घालणे झाले!  वरिष्ठ, सचिव पदाचे सनदी अधिकारी किंवा न्यायाधीश या समितीचे अध्यक्ष आणि जिल्ह्याबाहेरील अधिकारी समितीवर नेमले असते तर आपल्यातील न्यायप्रिय मुख्यमंत्री दिसला असता.

आता ही समिती निव्वळ देखावा आहे, अशी टीका आ. अंबादास दानवे यांनी ‘एक्स’वर व्टिट करून केली आहे. दरम्यान, गुरुवारी (१८ डिसेंबर) पत्रकारांशी बोलताना आ. दानवे यांनी ‘सातारा ड्रग्स प्रकरणात जी नावे समोर येत आहेत, ते धागेद्वारे उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचत आहेत’, असा आरोप केला. महायुतीकडून उमेदवारी मिळाली नाही तर आम्हाला उमेदवारी मिळेल का, अशी विचारणा करणारे अनेक कॉल येत असल्याचे दानवे यांनी सांगितले.

मंत्री शिरसाटांचे उत्तर...
विट्स प्रकरणाच्या चौकशीसाठी राष्ट्रपतींना नेमा, सुप्रीम कोर्टाला नेमा अशी मागणी करणाऱ्यांना यातील काहीही माहिती नाही. अकलेचा आणि त्यांचा काहीही संबंध नाही. उंटावर बसून शेळ्या हाकलू नका. अर्धा किलोमीटरवर कोर्ट आहे, तेथे रिट दाखल करा, असा टोला मंत्री संजय शिरसाट यांनी आ. दानवे यांना लगावला. मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदे गट आणि भाजपची महायुती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त करत मुंबईत मनसेला ज्या जागा पाहिजेत त्या ठाकरे गट कितपत सोडेल त्यावरच त्यांची युती अवलंबून असल्याचा टोलाही लगावला.

माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण झाल्याच्या प्रकाराबद्दल ते म्हणाले, की इम्तियाज जलील असोत किंवा ओवेसी यांच्या रक्तात हुकूमशाहीची रचना आहे. नोटा उधळणे, दलाली करणे, समाजामध्ये तेढ निर्माण करणे, हे तुमचे छंद आहेत का, असा खोचक सवाल शिरसाट यांनी करत नोटा उधळणे हा गुन्हा असून, गुन्हा दाखल झाला पाहिजे, यासाठी मी पोलीस आयुक्तांना बोलणार आहे, असे ते म्हणाले.
कोण आहे चौकशी समितीत...
हॉटेल विट्‌स खरेदी प्रकरणाच्या चौकशीसाठी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी समिती नेमली असून, या समितीत अध्यक्ष जिल्हाधिकारी तर सदस्यांमध्ये बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, निवासी उपजिल्हाधिकारी, पैठणचे उपविभागीय अधिकारी, लेषा व कोषागरे विभागाचे सहसंचालक, कामगार विभागाचे उपायुक्त, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, सह जिल्हा निबंधक, नगररचना विभागाचे सहायक संचालक यांचा समावेश आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ

Latest News

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहर व जिल्ह्यात मुस्लिम बांधवांची संख्या मोठी आहे. मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मास म्हणून ओळखल्या...
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
जमिनीच्या वादातून सेवानिवृत्त वनअधिकाऱ्याचे भरदिवसा अपहरण करून लुटले, ७ तास धरले वेठीस, छत्रपती संभाजीनगरची खळबळजनक घटना
सिल्लोडजवळ २ भीषण अपघात : अज्ञात वाहनाची कारला मागून धडक, एकाचा मृत्‍यू; मका नेणारा ट्रक उलटून चालक जखमी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software