मंत्री अतुल सावे, आ. संजय शिरसाट यांच्यासह २८ उमेदवारांनी भरले उमेदवारी अर्ज, मंगेश साबळेंसह शिंदे गटाचे रमेश पवारही फुलंब्रीच्या रिंगणात

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या चौथ्या दिवशी शिंदे गटाचे उमेदवार संजय शिरसाट, भाजपचे उमेदवार अतुल सावे यांच्यासह २८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. २९ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्जांची विक्री आणि स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. शुक्रवारी फुलंब्रीतून गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे, शिंदे गटाचे […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या चौथ्या दिवशी शिंदे गटाचे उमेदवार संजय शिरसाट, भाजपचे उमेदवार अतुल सावे यांच्यासह २८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. २९ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे.

२२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्जांची विक्री आणि स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. शुक्रवारी फुलंब्रीतून गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे, शिंदे गटाचे रमेश पवार यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत. छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून शिंदे गटाचे संजय शिरसाट यांनी दोन अर्ज भरले असून छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघातून भाजपचे अतुल सावे यांनीही दोन अर्ज भरले आहेत.

मतदारसंघनिहाय आलेले अर्ज
सिल्लोड -३, कन्‍नड -३, छत्रपती संभाजीनगर मध्य- १, छत्रपती संभाजीनगर पश्चिम – ३, छत्रपती संभाजीनगर पूर्व – ६, पैठण- ९ असे अर्ज दाखल झाले आहेत. गंगापूर आणि वैजापूर मतदारसंघातून शुक्रवारी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याचे सांगण्यात आले.

पूर्व मतदारसंघात अर्ज भरणारे उमेदवार
अतुल सावे (भाजप), शेख गफरान अहमद (अपक्ष), साहेब खान यासीन खान पठाण (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), जयप्रकाश गुलाबराव घोरपडे (भारतीय शेतकरी कामगार पक्ष), मोहम्मद इसा मोहम्मद यासीन (आॅल इंडिया मजलिस-ए- इन्कलाब ए- मिल्लत).

आणखी महत्त्वाच्या बातम्या

ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली!

Latest News

ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली! ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसी परिसरातील वडगाव कोल्हाटीतील गट नं. ९ मधील रहिवासी अनेक वर्षांपासून मुलभूत सुविधांपासून...
एसटी बसने दागिने घेऊन प्रवास करत असाल तर सतर्क व्हा, चोर महिलांच्या टोळ्या तुमचे दागिने चोरून होतील गायब!, शास्‍त्रीनगरातील महिलेचेही सव्वा लाखाचे दागिने नेले...
सिल्लोडच्या अन्वीत तरुणाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या
आदर्श घोटाळ्यातील संशयित महिला चक्क शिंदे गटात दाखल!  
जाधववाडीत २३ वर्षीय तरुणाची आत्‍महत्‍या, प्रेमप्रकरणातून टोकाचे पाऊल : पोलीस सूत्र
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software