अवघे छत्रपती संभाजीनगर शहरच ‘गॅस’वर!; घरगुती गॅसची कृत्रिम टंचाई, ९२१ रुपयांचा सिलिंडर २ हजार रुपयांनी विकताहेत विक्रेते, प्रशासनाचे दावे फोल, दावे करण्यापेक्षा आता थेट टीम बनवून छापे मारा... शहरवासियांची मागणी!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : घरगुती गॅसचा पुरेसा साठा असल्याचा दावा प्रशासन करत असले तरी प्रत्यक्षात मात्र शहर आणि जिल्ह्यात विक्रेत्यांनी घरगुती गॅसची तीव्र कृत्रिम टंचाई निर्माण केली आहे. ग्राहकांची सर्रास आर्थिक लूट केली जात असून, काळ्या बाजारात गॅसची किंमत ९२१ रुपयांवरून २ हजार रुपयांवर गेली आहे. विक्रेत्यांनी जाणूनबुजून आर्थिक नफ्यासाठी साठेबाजी सुरू केल्याचे दिसून येत आहे. याकडे प्रशासनाकडे मात्र साफ दुर्लक्ष होत असून, वितरण व्यवस्था नियमित सुरू असल्याचे सांगून विक्रेत्यांचीच भलावण चालू आहे. प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून, ग्राहकांना वेळेत आणि आहे त्या किंमतीला गॅस उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

व्यावसायिक सिलिंडर ब्लॅकमध्ये, एजन्सीमालकांचे हात वर
जिल्ह्यात ७४ गॅस एजन्सी असून, बहुतांश एजन्सींमधील व्यावसायिक सिलिंडरचा साठा संपला असल्याचे एजन्सी मालकांनी म्हटले आहे. एजंट त्यांच्याकडील शिल्लक सिलिंडर थेट ३ हजार रुपयांपर्यंत विकत असल्याचा आरोप एजन्सीमालकांनी केला आहे. 
४०० हून अधिक उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर
आखाती देशांतून पेट्रोलियम पदार्थांची होणारी आयात बंद असल्याने वाळूज औद्योगिक वसाहतीतील ४०० हून अधिक उद्योग बंद पडण्याचे संकट निर्माण झाले आहे. २ लाख कामगार बेरोजगार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कॅन पॅक इंडियाचे सीईओ विक्रम पोतदार यांनी सांगितले, की ४०० कंपन्यांचे बॉयलर गॅसवर आहेत. आमच्या कंपनीची रोजची १२ मे. टन गॅसची गरज आहे. ४ दिवस पुरेल इतकाच गॅस आमच्याकडे शिल्लक आहे. बॉयलर बंद झाल्यास ६०० कोटींच्या आसपास फटका बसेल.

दिल्ली विमान प्रवास ३९९ रुपयांनी महागणार
छत्रपती संभाजीनगर-दिल्ली विमान प्रवासाचे तिकीट दर एअर इंडिया ३९९ रुपयांनी वाढले आहे. जेट इंधन दर वाढल्याने विमान तिकिटांवर आज, १२ मार्चपासून ३९९ रुपयांचा इंधन अधिभार बुकिंगसाठी लागू झाला. एअर इंडियाकडून छत्रपती संभाजीनगरहून सध्या दिल्लीसाठी सकाळ आणि दुपारच्या सत्रात विमानसेवा सुरू आहे.

प्रशासनाचा दावा फोल, उपाययोजना शून्य अन्‌ म्हणे पुरेसा साठा उपलब्ध
इंधन पुरवठ्याबाबत विविध प्रकारच्या बातम्या प्रसारित होत असल्या तरी नागरिकांनी कोणताही गैरसमज करून घेऊ नये. छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये घरगुती एलपीजी (LPG) सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून वितरण व्यवस्था नियमितपणे सुरू असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र हा दावा सातत्याने फोल ठरत आहे. प्रत्यक्षातील चित्र वेगळेच असून, कृत्रिम टंचाई निर्माण करून घरगुती गॅस २ हजार रुपयांपर्यंत विकला जात आहे. केंद्र सरकारच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार देशात घरगुती एलपीजी उत्पादनाला प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार देशातील तेल शुद्धीकरण कंपन्यांना प्रोपेन व ब्यूटेन यांसारख्या घटकांचा वापर प्राधान्याने एलपीजी उत्पादनासाठी करून तो सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या इंडियन ऑईल (IOCL), भारत पेट्रोलियम (BPCL) व हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) यांना उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या एलपीजीचा पुरवठा प्रामुख्याने घरगुती ग्राहकांसाठी करण्यात येणार आहे. तेल विपणन कंपन्यांनीही स्पष्ट केले आहे की घरगुती ग्राहकांना एलपीजीचा पुरवठा सुरळीतपणे सुरू राहील. रुग्णालये, शैक्षणिक संस्था यांसारख्या अत्यावश्यक गैर-घरगुती क्षेत्रांनाही आवश्यकतेनुसार एलपीजी पुरवठा करण्यात येणार आहे. इतर गैर-घरगुती क्षेत्रांच्या मागण्यांचे परीक्षण करून प्राधान्यक्रम ठरवण्यासाठी तेल विपणन कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची समितीही स्थापन करण्यात आली आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना

Latest News

भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना
वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भरधाव पिकअप वाहनाने दिलेल्या धडकेत २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना पुरणगाव (ता. वैजापूर)...
नापिकी, कर्जबाजारीपणाचे आणखी २ बळी!; सिल्लोड, कन्नड तालुक्यातील २ शेतकऱ्यांनी कवटाळले मरण!!
फीट येऊन चुलीवर पडल्याने महिलेचा मृत्यू, सातारा परिसरातील संत ज्ञानेश्वरनगरातील घटना
३ दिवसांपासून बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह आढळला नदीकाठी!; कन्नडच्या घटनेने खळबळ
विहिरीत पडून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, पिशोर येथील दुर्दैवी घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software