- Marathi News
- पॉलिटिक्स
- छ. संभाजीनगरात राज ठाकरे यांचा गंभीर आरोप; मनोज जरांगेंच्या आडून उद्धव ठाकरे अन् शरद पवार कालवताहेत...
छ. संभाजीनगरात राज ठाकरे यांचा गंभीर आरोप; मनोज जरांगेंच्या आडून उद्धव ठाकरे अन् शरद पवार कालवताहेत जातीजातीत विष!; मराठा आंदोलक १० तास पोलिसांच्या नजरकैदेत
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मनोज जरांगे यांच्या आडून उद्धव ठाकरे आणि शरद पवार जाती-जातीत विष कालवण्याचे राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज, १० ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरात पत्रकारांशी बोलताना केला. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा राग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. त्यांच्यावरील संतापामुळेच हे नेते जातीजातींत द्वेष पसरवत […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मनोज जरांगे यांच्या आडून उद्धव ठाकरे आणि शरद पवार जाती-जातीत विष कालवण्याचे राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज, १० ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरात पत्रकारांशी बोलताना केला. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा राग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. त्यांच्यावरील संतापामुळेच हे नेते जातीजातींत द्वेष पसरवत आहेत. पवार वर्षानुवर्षे सत्तेत होते, उद्धव ठाकरेंच्याही हाती सत्तार होती, मग त्यांनी मराठा आरक्षण का दिले नाही, असा सवाल राज ठाकरे यांनी केला.
राज ठाकरे छत्रपती संभाजीनगरात येण्यापूर्वीच शहर पोलिसांनी मराठा आंदोलकांची पहाटे पाचपासूनच धरपकड सुरू केली होती. १० तास मराठा आंदोलकांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवले. विकीराजे पाटील, पंढरीनाथ गोडसे, ॲड. सुवर्णा मोहिते, भारत कदम यांच्यासह अनेक मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे होते.
राज ठाकरे म्हणाले…
लोकसभेच्या निकालांनंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना वाटत आहे की त्यांना मराठवाड्यात भरघोस मतदान जे झालं ते या दोघांकडे बघून झालं, या दोघांनी हे समजून घेतलं पाहिजे की हे जे मतदान झालं ते नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या विरोधातील मतदान झालं. मुस्लिम समाजाने देशभर मोदींच्या विरोधात मतदान इथे किंवा देशभर झालं किंवा दलित बांधवांना संविधान बदलणार असं वाटलं आणि त्यांनी मोदींच्या विरोधात जे मतदान केलं त्यातून हे घडलं आहे. मी मागच्या पत्रकार परिषदेत बोललो तसं संविधान बदलणार हे भाजपचे काही लोकं बोलले आणि त्यातून नरेटिव्ह तयार झालं. काल निदर्शनं करणाऱ्या उद्धव गटाच्या जिल्हाप्रमुखाला आमच्या लोकांनी चांगला चोप दिला आणि तो जाताना ओरडत गेला की एक मराठा लाख मराठा. म्हणजे काय यांना जरांगेच्या आंदोलनाच्या आड स्वतःच विधानसभेचं राजकारण करायच आहे. शरद पवार म्हणतात महाराष्ट्राचा मणिपूर होईल… पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने मणिपूर होऊ नये म्हणून प्रयत्न करायचा तर हेच मणिपूर होईल म्हणत आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी यांना खासकरून मराठवाड्यात दंगली घडवायच्या आहेत. माझी पत्रकारांना पण विनंती आहे की तुमच्यातले जातींचं राजकारण करणारे जे पत्रकार आहेत त्यांना तुम्ही दूर सारलं पाहिजे; कालच्या बीड प्रकरणात तीन पत्रकार सापडलेत.
