भाडेकरूने केला घरमालकिनीचा विश्वासघात, नवनाथनगरात काय घडलं...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भाडेकरूनेच घरमालकिनीची दागिन्यांची पिशवी लांबवल्याची घटना गारखेडा परिसरातील नवनाथनगरात समोर आली आहे. या पिशवीत १ लाख १ हजार रुपयांचे दागिने होते. ३० नोव्‍हेंबरपासून ५ डिसेंबरपर्यंत तो परत येईल, या आशेवर बसलेल्या घरमालकिनीने अखेर पुंडलिकनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी या भाडेकरूविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मीना कलाचंद गुप्ता (वय ४८, रा. नवनाथनगर, गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्यांचे पती भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांचे राहते घर तीन रूमचे असून त्यामधील दोन रुममध्ये गुप्ता कुटुंब राहते, तर एक खोली फेब्रुवारी २०२५ पासून भाड्याने धर्मेंद्र सहानी (वय ३०, रा. उत्तर प्रदेश) याला दिली होती. २१ नोव्‍हेंबरला भाचाचे लग्न असल्याने मीना गुप्ता या पतीसह उत्तरप्रदेशला जाणार होत्या. धर्मेंद्रही त्याच्या पत्नीला आणण्यासाठी त्यांच्यासोबत गावाकडे येणार होता. १२ नोव्‍हेंबरला दुपारी ३ ला मीना यांनी काळ्या बॅगमध्ये कपडे आणि दागिने असलेली पिशवी असे सर्व सामान भरून त्याची चावी पर्समध्ये ठेवली. पर्स बॅगेच्या वर ठेवून घराची कडी लावून औषधी घेण्यासाठी संध्याकाळी सहाला त्या एकट्या पायी गेल्या. त्यावेळी धर्मेंद्र बाथरूमजवळ कपडे धूत होता.

मीना यांनी त्याला बॅगवर लक्ष ठेवायला सांगितले होते. रात्री ११ ला छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्टेशनवरून मीनाबाई, त्यांचे पती आणि धर्मेंद्र हे छपरा एक्स्प्रेसने गावाकडे निघाले. पूर्ण प्रवासात मीना यांनी बॅग उघडून पाहिली नाही. १४ नोव्‍हेंबरला तिघेही वाराणसी रेल्वेस्टेशनवर उतरले. त्यानंतर गुप्ता दाम्पत्य जौनपूरच्या बसमध्ये बसले व धर्मेंद्र हा गोरखपूरला जाणाऱ्या बसमध्ये बसून निघून गेला. याच दिवशी दुपारी १२ ला मीना यांनी घरी पोहोचल्यावर कपड्याची बॅग उघडली असता बॅगेत दागिन्यांची पिशवी मिळून आली नाही. धर्मेंद्रनेच ती लांबवल्याचा संशय मीना यांना आला आहे. सोन्याची साखळी, सोन्याची अंगठी, झुमके, पैंजण, जोडवे असे एकूण १ लाख १ हजार रुपयांच्या दागिन्यांची पिशवी धर्मेंद्रने लांबवल्याची तक्रार मीना यांनी गावावरून परत आल्यावर शुक्रवारी (५ डिसेंबर) पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात येऊन दिली. अधिक तपास पोलीस अंमलदार शिवाजी शिंदे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

खुलताबादमध्ये सत्ता हातून गेल्याने आ. चव्हाणांचा तिळपापड!; भाजप-ठाकरे गटाच्या युतीवर म्हणाले, आम्ही बांगड्या घालून बसलो नाही...

Latest News

खुलताबादमध्ये सत्ता हातून गेल्याने आ. चव्हाणांचा तिळपापड!; भाजप-ठाकरे गटाच्या युतीवर म्हणाले, आम्ही बांगड्या घालून बसलो नाही... खुलताबादमध्ये सत्ता हातून गेल्याने आ. चव्हाणांचा तिळपापड!; भाजप-ठाकरे गटाच्या युतीवर म्हणाले, आम्ही बांगड्या घालून बसलो नाही...
खुलताबाद (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : खुलताबाद पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती पदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्‍या गटाने चक्‍क भाजपला साथ दिली. ही...
बायको दारू पिण्यासाठी पैसे देत नाही म्हणून नवऱ्याने घर दिले पेटवून!, सिल्लोडची घटना
पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात सहायक फौजदाराने पीडितेच्या पतीला कानशिलात वाजवल्याचा आरोप, जोरात फटका बसल्याने जमिनीवर कोसळला... व्हायरल व्हिडीओचे सत्य काय..?
मित्राच्या घरात आढळला युवकाचा संशयास्पदस्थितीत मृतदेह, बिडकीनजवळील घटनेने खळबळ
छत्रपती संभाजीनगरच्या उद्योजकांना उद्योगमंत्र्यांनी केले आश्वस्त, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे अधिकार वापरण्याची केली सूचना, उद्योजकांशी बोलताना काय म्हणाले...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software