आता आम्ही त्‍यांचे डझनभर फोडू ; खा. भागवत कराड यांचा ठाकरे गटाला इशारा

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांच्यासह एक- दोन माजी नगरसेवक ठाकरे गटाने फोडले. आम्ही आता ठाकरे गट आणि काँग्रेसमधील डझनभर माजी नगरसेवक फोडू, असा इशारा खा. डॉ. भागवत कराड यांनी दिला आहे. ते सोमवारी (८ जुलै) पत्रकारांशी बोलत होते. डॉ. कराड म्हणाले, आजी-माजी नगरसेवक पक्षांतर करीत असतात. विधानसभा निवडणुकीत जागा […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांच्यासह एक- दोन माजी नगरसेवक ठाकरे गटाने फोडले. आम्ही आता ठाकरे गट आणि काँग्रेसमधील डझनभर माजी नगरसेवक फोडू, असा इशारा खा. डॉ. भागवत कराड यांनी दिला आहे. ते सोमवारी (८ जुलै) पत्रकारांशी बोलत होते.

डॉ. कराड म्हणाले, आजी-माजी नगरसेवक पक्षांतर करीत असतात. विधानसभा निवडणुकीत जागा कुणाला सुटणार, हे वरिष्ठ ठरवतील. राजू शिंदे यांना छत्रपती संभाजीनगर पश्चिमची निवडणूक लढण्याची इच्छा आहे. त्यांना ठाकरे गटाकडून उमेदवारीचा शब्द मिळाला असेल, म्हणून ते गेले आहेत, असे ते म्‍हणाले.

ठाकरे गटात नाराजीसत्र…
राजू शिंदे यांनाच विधानसभेची उमेदवारी मिळेल अशी शक्‍यता असल्याने ठाकरे गटातील निष्ठावान पदाधिकारी व उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांत नाराजी पसरली आहे. ते सामूहिक राजीनामे देण्याच्या तयारीत असल्याचे समोर येत आहे. त्यांनी याबाबत सोमवारी गुप्त बैठक घेऊन चर्चाही केली. विधानसभा निवडणुकीपूर्वी मातोश्रीवर जाऊन सर्व काही सांगावे. त्यानंतर काही बदल झाला तर ठीक अन्यथा राजीनामा देण्याची तयारी या सर्वांनी केल्याचे सूत्रांनी सांगितले. त्‍यासाठी सोशल मीडियावर नाव न घेता पोस्टही टाकल्या जात आहेत. २०१० साली मनपा सभापती निवडणुकीत शिवसेना- भाजपातील वादावरून पोलिसांत गेलेले प्रकरण, अॅट्रॉसिटीच्या तक्रारींचा हवाला देत अनेकांनी सोशल मीडियात पोस्ट केल्या आहेत. पक्षातील सगळे इच्छुक एकत्र आले असून, त्यांचा वेगळा दबावगट निर्माण होण्याची शक्यता आहे.

गुलमंडीत आढावा बैठक
भारतीय जनता पार्टी गुलमंडी मंडळच्या वतीने आयोजित राज्य सरकारच्या अर्थसंकल्पातील विविध योजनासंदर्भात आढावा बैठक झाली. खा. डॉ. भागवत कराड, प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, प्रदेश प्रवक्ते सुहास दशरथे, शहर सरचिटणीस समीर राजूरकर, हर्षवर्धन कराड, सौ.अमृता पालोदकर, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कचरू घोडके, शहर उपाध्यक्ष राजेश मेहता, महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस सौ. मिनाताई मिसाळ, भाजयुमो शहराध्यक्ष रामेश्वर भादवे, मंडळाध्यक्ष सिद्धार्थ साळवे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software