विभागीय आयुक्‍त कार्यालयासमोर सरपंचपती, ग्रा. पं. अधिकाऱ्याचा राडा!; दोन गटांत हाणामारी, छत्रपती संभाजीनगरची घटना, प्रकरण लातूरचे, सुनावणीसाठी होते छ. संभाजीनगरला...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गायरान जमिनीवर घर बांधणाऱ्या सरपंच महिलेला जिल्हाधिकाऱ्यांनी पदास अपात्र ठरवले. या कारवाईविरोधात सरपंचांनी विभागीय आयुक्‍तांकडे अपील केले. त्यावर शुक्रवारी (१२ डिसेंबर) दुपारी सुनावणी झाली. सुनावणीनंतर बाहेर पडलेल्या सरपंचपतीने विभागीय आयुक्‍त कार्यालयासमोर राडा केला. तक्रार करणाऱ्या नागरिकासह ग्रामपंचायत सदस्यपतीला बेदम मारहाण केली. वकिलालाही धमकी दिली. सिटी चौक पोलिसांनी सरपंच पती, त्याचा साथीदार ग्रामपंचायत अधिकारी आणि अन्य दोघांविरुद्ध सोमवारी (१५ डिसेंबर) गुन्हा दाखल केला आहे.

भगवान मंचक ससाणे (वय ४३, रा. बोरगाव खुर्द, ता. अहमदपूर जि. लातूर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्यांच्या पत्नी प्रतिभा या अहमदपूर (जि. लातूर) तालुक्यातील लेंडेगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत. या ग्रामपंचायतीच्या सरपंच विद्या रमेश कांबळे आहेत. गायरान जमिनीवर सरपंचांनी घर बांधले, याची तक्रार लेंडेगाव येथील गौतम गोविंदराव लेंडेगावकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सरपंच विद्या कांबळे यांना पदावरून पायउतार केले. या कारवाईविरोधात विभागीय आयुक्तांकडे अपील करण्यात आले आहे.

शुक्रवारी (१२ डिसेंबर) दुपारी साडेचारला सुनावणी असल्याने भगवान ससाणे, तक्रारदार गौतम लेंडेगावकर आणि ॲड. श्रीकांत म‌द्दे हे छत्रपती संभाजीनगरला आले होते. सुनावणीनंतर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रवेश‌द्वाराजवळीळ लोखंडी गेटबाहेर रोडवरून पायी चालत मुख्य रस्त्यावर येत असताना सरपंचपती रमेश संभाजी कांबळे धावत आला. तो म्हणाला, की तू माझ्या पत्नीची तक्रार करणाऱ्या गौतमसोबत सुनावणीला का आलास, तुला काही काम धंदा नाही का, असे म्हणून त्याने भगवान ससाणे यांना शिवीगाळ करून त्याच्या हातातील लोखंडी रॉडने ससाणे यांच्या डाव्या दंडावर व डोक्यावर डाव्या बाजूने मारले. यात ससाणे यांचे डोके फुटून रक्त निघाले.

ससाणे रोडवर पडले असता त्याने लाथा मारल्या. सोबतचे गौतम लेंडेगावकर भांडण सोडविण्यास आले असता रमेशने त्यांनाही लोखंडी रॉडने मारले. तेथे उभ्या नागरिकांनी भांडण सोडवले. तुला, गौतम व वकिलांना पाहून घेतो, असे म्हणत रमेशने जीवे मारण्याची धमकी दिली. नंतर एका कारमध्ये लेंडेगाव ग्रामपंचायत अधिकारी एस. व्ही. स्वामी बसलेला होता. त्याने व सोबतच्या दोन लोकांनीही ससाणे व लेंडेगावकर यांना शिवीगाळ केली. घाटी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर ससाणे यांनी लेंडेगावकर व अॅड. म‌द्दे यांच्यासह सिटी चौक पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. पोलिसांनी सरपंच पती रमेश कांबळे, ग्रामपंचायत अधिकारी एस. व्ही. स्वामी व इतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार खानदेश पाटील करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पार्किंगच्या क्षुल्लक वादातून बायजीपुऱ्यात २१ वर्षीय तरुणावर चाकूचे सपासप वार

Latest News

पार्किंगच्या क्षुल्लक वादातून बायजीपुऱ्यात २१ वर्षीय तरुणावर चाकूचे सपासप वार पार्किंगच्या क्षुल्लक वादातून बायजीपुऱ्यात २१ वर्षीय तरुणावर चाकूचे सपासप वार
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पार्किंगच्या क्षुल्लक वादातून २१ वर्षीय तरुणावर समीर नावाच्या तरुणाने चाकूने सपासप वार करून गंभीर...
३ अपघातांत एक ठार, ३ गंभीर जखमी, पैठण, सिल्लोड, गंगापूर तालुक्यातील दुर्घटना
तरुण पिढीला हे झालंय काय?; १७ वर्षीय मुलीने स्वतःला पेटवून घेतले, एका मुलाने विष पिले, दोघांनी घेतला गळफास!; वाळूज MIDC परिसरातील घटनांनी समाजमन हेलावले...
छत्रपती संभाजीनगरमध्ये MIM ला आला सक्षम पर्याय!;  इस्लाम पक्षाची दणक्यात एंटी!!; कटकटगेट भागातील इफ्तार पार्टीला आले पक्षप्रमुख शेख आसीफ... भाजप, MIM वर सोडले टीकास्त्र 
वैजापूर बाजार समिती भाजपच्या ताब्यात, सभापतीपदी कल्याण दांगोडे बिनविरोध
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software