Editor's opinion : हवेतले पतंग जमिनीवर... उद्धव ठाकरेंसोबत दसरा मेळाव्याला राज ठाकरे का राहिले नाहीत उपस्थित? पावसात उद्धव ठाकरे एकटेच गर्जना करत होते...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

मनाेज सांगळे, संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट

बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी मुंबईत झालेल्या दसरा मेळाव्यांना दोन्ही शिवसेना गटांचे शक्तीप्रदर्शन मानले जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याला मनसे प्रमुख राज ठाकरे येतील, अशी आधी चर्चा होती. दोन्ही भावांनी एकत्र यावे, यासाठी ही मोठी भावनिक संधीही होती. मात्र असे झाले नाही. अर्थात तसे ते होणारही नव्हते. सुरुवातीपासून दोन्ही भावांच्या युतीचे जे पतंग हवेत उडवले जात आहेत. त्यात भावनिक बंध कमी अन्‌ स्वार्थी सत्ताकारण अधिक असल्याने एक भाऊ जेव्हा पुढे येतो, तेव्हा दुसरा मागे गेलेला दिसतो... त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आशा-अपेक्षा वाढणे नाहक आणि निरर्थक ठरते.

शिवाजी पार्कवर शिवसैनिकांसाठी एकटे उद्धव ठाकरेच गर्जना करत राहिले. राज ठाकरे यांनी आपल्या शिवतीर्थ निवासस्थानी दसरा साजरा केला. शिंदे आणि ठाकरे समर्थकांमध्ये सोशल मीडियावर सध्या युद्ध सुरू आहे, की कुणाचा मेळावा यशस्वी राहिला? मुसळधार पावसात उद्धव ठाकरे शिवसैनिकांना संबोधित करतानाचे फोटो व्हायरल होत आहेत.

n95hmh44_raj-and-uddhav-welcome (1)

राज ठाकरे का आले नाहीत?
विजयादशमीनिमित्त दसरा मेळावा हा शिवसेनेच्या प्रमुख कार्यक्रमांपैकी एक मानला जातो. दोन्ही भाऊ दसरा मेळाव्यात एकत्र येण्याची शक्यता आहे, अशी बरीच चर्चा होती. ठाकरे गट आणि मनसे यांच्यात युतीची घोषणाही होईल, अशी अटकळ समर्थक बांधत होते. परंतु तसे काहीही झाले नाही. राज ठाकरे दसरा मेळाव्याला अनुपस्थित राहिले. राज ठाकरे दसरा मेळाव्याला न येण्याचे कारण असे समोर आले, की त्यांना निमंत्रणच मिळाले नव्हते. ते स्वतः एका राजकीय पक्षाचे प्रमुख आहेत. त्यामुळे ते कसे असेच उद्धव यांच्या मेळाव्यात सहभागी होतील? २००५ मध्ये दोन्ही भाऊ वेगळे झाल्यानंतर, या वर्षी वरळी येथील एका गैर-राजकीय व्यासपीठावर एकत्र आले होते. १९६६ पासून शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा आयोजित केला जात आहे. काही पक्ष नेत्यांचा असा विश्वास होता की दसरा मेळाव्यात दोन्ही भाऊ एकत्र आल्याने आगामी निवडणुकांसाठी सकारात्मक संदेश गेला असता, कारण हा मेळावा शिवसेनेची ओळख, अस्तित्व आणि संस्थापक बाळसाहेब ठाकरे यांच्याशी जोडलेला आहे.

हवेत पतंग उडवण्यापलिकडे काही नाही...
दोन्ही पक्षांमधील युतीबद्दल खूप प्रचार समर्थकांनी केला आहे. मात्र राज ठाकरे यांनी अद्याप दोन्ही पक्षांमधील युतीबद्दल थेट काहीही सांगितले नाही. ज्या काही प्रतिक्रिया आल्या आहेत त्या ठाकरे गटाकडून आल्या आहेत. या युतीला भावनिक बंध नाहीत. त्यामुळे जोपर्यंत हे निश्चित होत नाही, की कोणता पक्ष कोणाला, कसा आणि किती वाटा देईल, तोपर्यंत युतीची कोणतीही चर्चा काहीच कामाची नाही. हे लक्षात घेण्यासारखे आहे की उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे २० आमदार आहेत, ज्यापैकी बहुतेक जण मुंबईतून जिंकले आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंत निवडणुका घ्याव्यात, असा निर्णय दिला आहे, त्यामुळे दोन्ही पक्ष युतीच्या मुद्द्यावर किती काळ मौन बाळगतील हे पाहावे लागेल.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मुकुंदवाडीच्या पोलीस अंमलदारावर हॉटेलमध्ये राड्याचा आरोप, मारहाणीसह चाकू हल्ल्यात चौघे जखमी, हॉटेलमालकानेच पकडून करमाड पोलिसांत नेले...

Latest News

मुकुंदवाडीच्या पोलीस अंमलदारावर हॉटेलमध्ये राड्याचा आरोप, मारहाणीसह चाकू हल्ल्यात चौघे जखमी, हॉटेलमालकानेच पकडून करमाड पोलिसांत नेले... मुकुंदवाडीच्या पोलीस अंमलदारावर हॉटेलमध्ये राड्याचा आरोप, मारहाणीसह चाकू हल्ल्यात चौघे जखमी, हॉटेलमालकानेच पकडून करमाड पोलिसांत नेले...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे अंमलदार नितेश जाधव यांच्यासह चौघांविरुद्ध हॉटेलमध्ये केलेल्या राड्याप्रकरणी करमाड पोलिसांनी मंगळवारी...
सिडको एन ३ भागात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले, महिलेने धरून ठेवल्याने १ तोळ्यापैकी ३ ग्रॅमचा भाग गेला...
अपघातानंतर फार्मसिस्टला दुचाकीस्वारांची मारहाण, मोबाइल हिसकावून पळाले... चिकलठाण्यातील घटना
भरधाव ट्रकने दुचाकीला मागून ठोकरले, दाम्‍पत्‍यासह चिमुकली जखमी, वाळूज MIDC तील घटना
रांजणगाव शेणपुंजीत एमआयडीसीच्या जागेवर पुतळा, झेंडा, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software