काय सांगता...  १० रुपयांची भांडे घासणी चक्क ११ हजारांना घेतली विकत!, गंगापूरच्या शिरेगावमध्ये असं काय घडलं...

On
"छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूज' वेबसाईटवर प्रसिद्ध होणारा मजकूर, छायाचित्रे 'मेट्रोपोलिस पोस्ट' वृत्तपत्राच्या परवानगीशिवाय पूर्णतः किंवा अंशतः कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना कुणीही आढळल्यास कोणतीही वेगळी नोटीस न देता कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. - संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्र

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने ) : घरातील भांडे घासण्याच्या घासणीची किंमत असते जास्तीत जास्त १० रुपये. पण हीच घासणी कुणी ११ हजार रुपयांत विकत घेतली तर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसेल. पण हो असे घडले आहे आणि ही किमया करून दाखवली आहे, गंगापूर तालुक्यातील शिरेगाव येथील बंडू अंबादास गोटे यांनी.

शिरेगाव येथील अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात झालेल्या वस्तूंच्या हराशीत बंडू गोटे यांनी भांड्याची घासणी चक्क ११ हजार रुपयांत खरेदी केली. महंत लक्ष्मणदास बाबा बैरागी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आठवडाभर चाललेल्या या सप्ताहाची सांगता सोमवारी (६ ऑक्‍टोबर) पांडुरंग महाराज उगले बीडकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली.

महाप्रसाद वाटपानंतर नेहमीप्रमाणे सप्ताहातील शिल्लक वस्तूंची हराशी करण्यात आली. गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे या हराशीत सहभाग घेतला. उरलेली साखर, बेसन पीठ, तांदूळ, ताडपत्री अशा सर्वच वस्तू चढ्या दराने विक्री झाल्या. मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते भांडे घासणीच्या हराशीने. या घासणीच्या खरेदीसाठी गावकऱ्यांनी मोठमोठ्या बोली लावल्या. पण सर्वाधिक ११ हजारांची बोली लावून बाजी मारली ती बंडू गोटे यांनी.

११ हजारांत घासणीचे मालक झालेल्या गोटे यांचा नंतर सप्ताह समितीसह गावकऱ्यांनी शाल, श्रीफळ आणि घासणी देऊन जंगी सत्कार केला. टाळ्यांच्या कडकडाटात गोटे यांनी हा सत्कार स्वीकारला. सध्या परिसरासह तालुक्यात गोटे यांच्या या भांडे घासणी खरेदीची मोठी चर्चा रंगली आहे. महंत लक्ष्मणदास बाबा बैरागी यांच्या कृपेनेच आजवर सर्व काही मिळाले. हराशीच्या माध्यमातून काही पैसे पुन्हा बाबांच्या चरणी अर्पण करता आले, याचा आनंद आहे, अशी भावना शेवटी बंडू गोटे यांनी व्यक्त केली.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सिडकोत टवाळखोरांचा कहर : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाला बेल्टने झोडपले, फायटरने मारले!

Latest News

सिडकोत टवाळखोरांचा कहर : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाला बेल्टने झोडपले, फायटरने मारले! सिडकोत टवाळखोरांचा कहर : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाला बेल्टने झोडपले, फायटरने मारले!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : सिडको एन ११ भागातील स्वामी विवेकानंदनगरात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या २० वर्षीय तरुणाला...
१७ वर्षीय मुलीचा मोबाइल स्विच्ड ऑफ येताच वडील शाळेत धावले, फूस लावून कुणीतरी पळवले!, किराडपुऱ्यातील घटना
छत्रपती संभाजीनगर जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची पंचसूत्री!; ६५१ बालकांना १४ नोव्हेंबरपर्यंत कुपोषणाच्या विळख्यातून बाहेर काढणार!!
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २६७ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना ‘एक हात मदतीचा’ ; गुरुवारपासून मिळणार मदत
विद्यापीठाकडून महाविद्यालयांना उद्यापासून ४ नोव्हेंबरपर्यंत सुट्टी, विद्यापीठ कॅम्प्‌सलाही २८ ऑक्‍टोबरपर्यंत सुट्टी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software