- News
- एक्सक्लुझिव्ह
- विकृताने माणुसकी सोडली… सरणावरील लाकडे पायाने उधळून म्हणाला, तुमची माणसे घरात जाळा!, फुलंब्री तालुक...
विकृताने माणुसकी सोडली… सरणावरील लाकडे पायाने उधळून म्हणाला, तुमची माणसे घरात जाळा!, फुलंब्री तालुक्यातील संतापजनक घटना, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
फुलंब्री (सीएससीएन वृत्तसेवा) : फुलंब्री तालुक्यातील धामणगाव येथे संतापजनक प्रकार समोर आला आहे. स्मशानभूमीत अनुसूचित जातीच्या व्यक्तीचे पार्थिव जाळण्यासाठी सरण रचले जात असताना गावातील विकृताने राडा केला. तुमची माणसे तुमच्या घरात जाळा असे म्हणत त्याने सरणावरील लाकडे लाथेने उधळली. पुन्हा इकडे आलात तर एकेकाला पाहून घेईल, अशी धमकी देत जातिवाचक शिवीगाळही केल्याची तक्रार फुलंब्री पोलीस […]
फुलंब्री (सीएससीएन वृत्तसेवा) : फुलंब्री तालुक्यातील धामणगाव येथे संतापजनक प्रकार समोर आला आहे. स्मशानभूमीत अनुसूचित जातीच्या व्यक्तीचे पार्थिव जाळण्यासाठी सरण रचले जात असताना गावातील विकृताने राडा केला. तुमची माणसे तुमच्या घरात जाळा असे म्हणत त्याने सरणावरील लाकडे लाथेने उधळली. पुन्हा इकडे आलात तर एकेकाला पाहून घेईल, अशी धमकी देत जातिवाचक शिवीगाळही केल्याची तक्रार फुलंब्री पोलीस ठाण्यात सोमवारी (२५ नोव्हेंबर) दाखल झाली आहे. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सुभाष कडूबा वाहुळ (वय ४५, रा. धामणगाव ता. फुलंब्री) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. तक्रारीत त्यांनी म्हटले आहे, की ते शेती करतात. रविवारी (२४ नोव्हेंबर) सकाळी त्यांचे काका सूर्यभान पिराजी वाहुळ यांचे निधन झाले. अंत्यविधीसाठी गावातील समाज बांधव एकत्र आले. समाजाच्या स्मशानभूमीकडे पार्थिव नेण्याचे ठरले. सकाळी १० ला स्मशानभूमीत सरण रचत असताना गावातील भाऊसाहेब आनंदा डिडोरे हा तिथे आला. येथे सरण रचू नका. ही आमची जागा आहे, असे म्हणाला.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
कावीळ सदृश आजाराने चिमुकलीचा मृत्यू, सिल्लोड तालुक्यातील दुर्दैवी घटना
By City News Desk
घरात आग लागून ६ जण होरपळले, दशमेशनगरातील घटना
By City News Desk
बाजारसावंगीत विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
By City News Desk
Latest News
05 Mar 2026 19:22:00
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : टीव्ही सेंटर चौकात एका पोलीस अंमलदाराला दोन टवाळखोरांनी क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण केली. पोलीस...

