नाथषष्ठी यात्रेमुळे पैठणकडे जाणाऱ्या जड वाहतूक मार्गात मोठा बदल, SP डॉ. राठोड यांनी काढले आदेश

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पैठण येथे ९ ते ११ मार्चदरम्यान संत एकनाथ महाराज नाथषष्ठी यात्रोत्सव आहे. राज्यभरातून अंदाजे १२ ते १५ लाख भाविक विविध वाहनाने वा पायी या उत्सवासाठी येत असतात. या कालावधीत वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये यासाठी पैठणकडे जाणाऱ्या व पैठणकडून येणाऱ्या जड वाहतूक मार्गात बदल करण्यात येत असल्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ.विनयकुमार राठोड यांनी काढले आहेत.

वाहतुक मार्गातील बदल असे :
१. शहागड- आपेगाव- पैठणकडून -छत्रपती संभाजीनगरमार्गे जाणारी वाहने शहागड -पाचोडमार्गे छत्रपती संभाजीनगरकडे येतील.
२. सोलापूर- धुळे महामार्ग कचनेर फाटा, पोरगाव चौफुली, बिडकीन -शेकटा -इसारवाडी फाटा- छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर हायवे मार्गे अहिल्यानगरकडे जाणारी वाहने सोलापूर-धुळे महामार्ग बीडमार्गे येणारी जड वाहतूक ही महामार्ग ते सरळ पुढे ए. एस. क्लबमार्गे छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर हायवेने अहिल्यानगरकडे जातील. याचप्रमाणे उलट दिशेने वाहने ये -जा करतील.
३. जालन्याकडून करमाड -कचनेर फाटा-पोरगाव - बिडकीनचे- शेकटा इसारवाडी फाटा -छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर हायवेमार्गे अहिल्यानगरकडे जाणारी वाहने ही करमाड -कचनेर फाटा -सोलापूर धुळे एनएच-५२ महामार्ग ते सरळ पुढे ए-एस क्लबमार्गे छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर हायवेने अहिल्यानगरकडे जाईल. या प्रमाणेच उलट दिशेने वाहने ये-जा करतील.
४. छत्रपती संभाजीनगर- बिडकीन -पैठणमार्गे शेवगावकडे जाणारी वाहने छत्रपती संभाजीनगर -वाळूज-गंगापूरमार्गे जातील.
५. शेवगाव-पैठण-बिडकीनमार्गे छत्रपती संभाजीनगराकडे येणारी वाहने शेवगाव –नेवासा-गंगापूर-वाळूजमार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जातील.
६. इसारवाडी फाटा -शेकटा-बिडकीन-पैठणकडे येणारी जड वाहने इसारवाडी फाटा ए.एस.क्लब बीड बायपासमार्गे पाचोडकडे जातील.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

माझ्यावर आधी ३०७, आता ३०२ करून टाकीन... चाकूचे सपासप वार करत गल्लीगुंडाने धमकावले!; बेगमपुरा भागातील घटना

Latest News

माझ्यावर आधी ३०७, आता ३०२ करून टाकीन... चाकूचे सपासप वार करत गल्लीगुंडाने धमकावले!; बेगमपुरा भागातील घटना माझ्यावर आधी ३०७, आता ३०२ करून टाकीन... चाकूचे सपासप वार करत गल्लीगुंडाने धमकावले!; बेगमपुरा भागातील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : चाकू घेऊन गल्लीत फिरत असल्याने महिलांनी एकत्र येऊन बेगमपुरा पोलीस ठाणे गाठले. त्यामुळे संतापलेल्या...
टीव्ही सेंटर चौकात दोन टवाळखोरांची पोलिसाला बेदम मारहाण, चाकूचे वार करून केले रक्तबंबाळ, पोलीस आहे तर काय झालं... म्हणत सुरू होता धिंगाणा
नाथषष्ठी यात्रेमुळे पैठणकडे जाणाऱ्या जड वाहतूक मार्गात मोठा बदल, SP डॉ. राठोड यांनी काढले आदेश
अपघातप्रसंगी मदत करणाऱ्यांना चौकशीचा ससेमिरा नाही, उलट बक्षीस देणार!; छत्रपती संभाजीनगरमध्ये राबविणार ‘राह-वीर’ योजना, जिल्हाधिकारी काय म्हणाले...
माता न तू वैरिणी...नवजात बाळाला शेतात फेकले, सुदैवाने नागरिकांनी वेळीच बघितले म्हणून वाचले...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software