- Marathi News
- एक्सक्लुझिव्ह
- पुरातत्व विभागाची रझाकारी कायम!; देवगिरी किल्ल्यावरील भारत मातेच्या पूजेला केवळ तासभराचा अवधी, हळदी...
पुरातत्व विभागाची रझाकारी कायम!; देवगिरी किल्ल्यावरील भारत मातेच्या पूजेला केवळ तासभराचा अवधी, हळदी-कुंकू, फुलेही वाहू द्यायला नकार…
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : देवगिरी (दौलताबाद) किल्ल्यातील भारतमाता मंदिरात पूजा-अर्चा करण्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने एक तासाचा अवधी दिल्यानंतर शनिवारी (२९ जून) पुजारी राजेंद्र कांजुणे यांच्या मुलाने सकाळी ८:५० ते ९:५० वाजेदरम्यान पूजा केली. मात्र, पूजेसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी करण्यात आली आहे. भारतमाता मंदिरात पूजा करू देण्यासाठी पुजारी कांजुणे यांनी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणकडे […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : देवगिरी (दौलताबाद) किल्ल्यातील भारतमाता मंदिरात पूजा-अर्चा करण्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने एक तासाचा अवधी दिल्यानंतर शनिवारी (२९ जून) पुजारी राजेंद्र कांजुणे यांच्या मुलाने सकाळी ८:५० ते ९:५० वाजेदरम्यान पूजा केली. मात्र, पूजेसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
पुरातत्व सर्वेक्षण विभागाने परवानगी दिली, पण अटी घातल्या आहेत. त्यानुसार केवळ अगरबत्ती लावून पूजा करायची आहे. दिवाबत्ती, हळदी-कुंकू व फुले वाहायची नाहीत. त्यावर बंदी कायम आहे. त्यामुळे धर्माचार्य जनार्दन महाराज मेटे यांनी रोष व्यक्त केला असून, कोणत्याही अटींशिवाय पूजेवरील बंदी उठवा अन्यथा हिंदू समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा दिला आहे. भारतमातेची पूजा बंद करणार असाल तर औरंगजेबाच्या कबरीवर चादर चढवणे अन् फुले वाहनेही बंद करा, अशी मागणी पुरोहित संघटनेचे सुभाष मुळे यांनी केली आहे.
दानवेंनी केला होता सवाल, खैरेंनी घेतली अधिकाऱ्यांची भेट…
भारतमाता मंदिर, गणेश मंदिर आणि संत जनार्दन स्वामी मंदिरात पूजा-अर्चा हा किल्ला पुरातत्व खात्याकडे येण्यापूर्वीपासून सुरू आहे. अनेक वर्षांपासून देवगिरी किल्ला हा ‘नॉन लिव्हिंग मॉन्युमेंट’ कसा? असा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला होता, तर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शुक्रवारी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या कार्यालयात जाऊन अधीक्षक डॉ. शिवकुमार भगत यांच्यासोबत चर्चा करीत पूजेसाठी परवानगीची मागणी केली.
