छत्रपती संभाजीनगरात विद्यार्थ्यांचा जीव धोक्‍यात घालून धावत होत्‍या ७८ स्‍कूल बस, RTO ने केली कारवाई!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विद्यार्थ्यांचा जीव धोक्‍यात घालून धावणाऱ्या ७८ स्कूल बसेसवर गेल्या दोन दिवसांत आरटीओ कार्यालयाने कारवाई केली आहे. नियमांकडे दुर्लक्ष करून विद्यार्थ्यांची नेआण केली जात असल्याबद्दल छत्रपती संभाजीनगर सिटी न्‍यूजने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्‍याची दखल घेत आरटीओने तपासणी मोहीम हाती घेतली आहे. शाळा सुरू झाल्यानंतर धोकादायक स्‍कूलबसचा प्रश्न पालकांनी छत्रपती संभाजीनगर […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विद्यार्थ्यांचा जीव धोक्‍यात घालून धावणाऱ्या ७८ स्कूल बसेसवर गेल्या दोन दिवसांत आरटीओ कार्यालयाने कारवाई केली आहे. नियमांकडे दुर्लक्ष करून विद्यार्थ्यांची नेआण केली जात असल्याबद्दल छत्रपती संभाजीनगर सिटी न्‍यूजने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्‍याची दखल घेत आरटीओने तपासणी मोहीम हाती घेतली आहे.

शाळा सुरू झाल्यानंतर धोकादायक स्‍कूलबसचा प्रश्न पालकांनी छत्रपती संभाजीनगर सिटी न्‍यूजकडे मांडला होता. तसे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर आरटीओ कार्यालयाचे पथक कारवाईसाठी सरसावले आहे. अनेक स्कूल बसमधून क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक होत होती, तर अनेक स्कूल बस फिटनेस प्रमाणपत्राशिवाय धावत असल्याचे कारवाईत समोर आले.

प्रादेशिक परिवहन अधिकारी (प्रभारी) विजय काठोले यांनी पत्रकारांना सांगितले, की फिटनेस प्रमाणपत्र नसणे, अग्निशमन यंत्रणा, क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी, स्पीड गव्हर्नर लॉक नसणे, विमा नसणे, महिला अटेंडंट नसणे, पीयूसी नसणे, प्रथमोपचार पेटी नसणे, सीट बेल्ट न लावणे आदी कारणांमुळे ७८ स्कूल बसकडून दंड आकारण्यात आला आहे. या कारवाईचे स्वागत पालकांनी केले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

चिकलठाण्याच्या हिनानगरमध्ये गोदामाला भीषण आग, मंडप डेकोरेशनचे लाखो रुपयांचे साहित्य खाक, आकाशात धुराचे लोट

Latest News

चिकलठाण्याच्या हिनानगरमध्ये गोदामाला भीषण आग, मंडप डेकोरेशनचे लाखो रुपयांचे साहित्य खाक, आकाशात धुराचे लोट चिकलठाण्याच्या हिनानगरमध्ये गोदामाला भीषण आग, मंडप डेकोरेशनचे लाखो रुपयांचे साहित्य खाक, आकाशात धुराचे लोट
छत्रपती संभाजीनगर‎ (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : चिकलठाणा भागातील हिनानगरमध्ये आज, ३ मार्चला दुपारी पाऊणच्या सुमारास मंडप डेकोरेशनच्या गोदामाला भीषण आग...
कोलठाणच्या खाटू श्यामजवळील तलावात बुडून दोन तरुणांचा मृत्यू, छत्रपती संभाजीनगरची दुर्दैवी घटना
लेक-सुनेला भेटायला गेल्या... उल्कानगरीत चोरट्यांनी घर साफ केले, पावणेदोन लाखांची चोरी !
धक्कादायक : एमजीएम हॉस्पिटलमधून रुग्णाच्या नातेवाइक महिलेची पर्स चोरीला गेली...
पार्किंगच्या क्षुल्लक वादातून बायजीपुऱ्यात २१ वर्षीय तरुणावर चाकूचे सपासप वार
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software