कोलठाणच्या तलावात बुडून दोन तरुणांचा मृत्यू, छत्रपती संभाजीनगरची दुर्दैवी घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरजवळील कोलठाणच्या गाव तलावात बुडून दोन तरुणांचा बुडून मृत्‍यू झाला. ही दुर्दैवी घटना आज, ३ मार्चला दुपारी घडली.

सचिन गजानन वराडे (वय २१) आणि समर्थ बाबासाहेब चितळे (वय १६, दोघे रा. सावित्रीनगर, चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर) अशी बुडून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, आज सकाळी आठ मित्र दुचाकीने आले होते. तलावाजवळ थांबण्याचा मोह आवरला नाही. पोहण्याचा उत्साह आवरता न आल्याने ५ मित्रांनी तलावात उडी घेतली. काठाजवळ पाणी कमी असल्याने ते पोहत असताना सचिन व समर्थ पोहत अचानक तलावाच्या खोल भागात गेले आणि दिसेनासे झाले. बराच वेळानंतर दोघे दिसत नसल्याचे पाहून सोबतच्या मित्रांनी आरडाओरड सुरू केली. नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली.

फुलंब्री पोलिसांना कळताच पोलीस निरीक्षक संजय सहाणे यांनी हेही सहकाऱ्यांसह घटनास्‍थळी धावले. स्थानिक तरुणांनी तलावात उतरून दोघांना बाहेर काढले व घाटी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. सचिन आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. तो गॅरेजवर काम करायचा. त्याच्या पश्चात आई-वडील व एक बहीण आहे. समर्थ हा मूळचा चाकेगाव (ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) येथील असून वर्षभरापासून चिकलठाण्यात मामाच्या घरी राहत होता. राजश्री शाहू विद्यालयात दहावीत शिकत होता. तपास सहायक पोलीस निरीक्षक रघुवीर मुराडे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना

Latest News

१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना १९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील पंढरपूर येथील कामगार चौकातील श्री जगदीश जयदीप इंडस्ट्रीज कंपनीत १९ वर्षीय तरुणाला...
चिकलठाण्याच्या हिनानगरमध्ये गोदामाला भीषण आग, मंडप डेकोरेशनचे लाखो रुपयांचे साहित्य खाक, आकाशात धुराचे लोट
कोलठाणच्या तलावात बुडून दोन तरुणांचा मृत्यू, छत्रपती संभाजीनगरची दुर्दैवी घटना
लेक-सुनेला भेटायला गेल्या... उल्कानगरीत चोरट्यांनी घर साफ केले, पावणेदोन लाखांची चोरी !
धक्कादायक : एमजीएम हॉस्पिटलमधून रुग्णाच्या नातेवाइक महिलेची पर्स चोरीला गेली...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software