- News
- एंटरटेनमेंट
- आजोबांच्या वयाच्या अंकलने कमरेला हात लावला... मौनी रॉयची हरियाणात भर कार्यक्रमात छेडछाड, प्रेक्षक अश...
आजोबांच्या वयाच्या अंकलने कमरेला हात लावला... मौनी रॉयची हरियाणात भर कार्यक्रमात छेडछाड, प्रेक्षक अश्लील हावभाव करत होते, तिने आक्षेप घेतल्यावर शिवीगाळही केली...
बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय हिने हरियाणातील कर्नाल येथे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमातील छेडछाडीबद्दल खुलासा केल्याने खळबळ उडाली आहे. तिने आरोप केला, की प्रेक्षकांमधील काही लोकांनी, ज्यात वृद्ध पुरुषांचाही समावेश होता, त्यांनी तिची छेड काढली. ती स्टेजकडे जात असताना, फोटो काढण्याच्या बहाण्याने अनेक पुरुषांनी तिच्या कंबरेला स्पर्श केला.
इंडस्ट्रीमध्ये नवीन येणाऱ्यांसाठी चिंता व्यक्त करताना ती म्हणाली, "जर माझ्यासारख्या एखादीला हे सहन करावे लागत असेल, तर मी कल्पनाही करू शकत नाही की जे नवीन कलाकार नुकतेच काम करू लागले आहेत आणि सादरीकरण करू लागले आहेत त्यांना काय सहन करावे लागत असेल. मला अपमान आणि धक्का बसला आहे आणि अधिकाऱ्यांनी या असह्य वर्तनाविरुद्ध कारवाई करावी अशी माझी इच्छा आहे. आम्ही कलाकार आहोत आणि आम्ही आमच्या कलेच्या माध्यमातून प्रामाणिकपणे आमचे जीवनमान उंचाविण्याचा प्रयत्न करत आहोत. कल्पना करा की जर या लोकांच्या मुली, बहिणी किंवा कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्याशी कुणी असे वागले तर काय करतील! तुम्हाला लाज वाटली पाहिजे, अशा शब्दांत मौनीने संताप व्यक्त केला.
पुरुषांमध्ये काय अहंकार आहे?
मौनी म्हणाली, की मला माझा देश, माझे लोक, माझ्या परंपरा आवडतात, पण हे सर्व? किती निर्लज्जपणा! पुरुष असण्याचा अहंकार! माझ्यासोबत घडणाऱ्या नकारात्मक गोष्टी मी कधीही सांगत नाही. पण हे सर्व सांगायलाही माझ्याकडे शब्द कमी पडत आहेत. आम्ही कलाकार वधू-वरांचे अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांच्या आनंदात भर घालण्यासाठी अशा कार्यक्रमांमध्ये जातो. आम्ही त्यांचे पाहुणे आहोत आणि ते आम्हाला अशा प्रकारे त्रास देतात. श्शीऽऽ
मौनी रॉयचे चित्रपट
मौनी रॉयने गेल्या वर्षी संजय दत्त आणि सनी सिंह यांच्यासोबत "द भूतनी’ या चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकली आणि नंतर ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या स्पाय थ्रिलर "सलाकार’मध्ये ती दिसली.

