- Marathi News
- एंटरटेनमेंट
- Special Interview : आईने मला नेहमीच प्रोत्साहन दिले, तिच्यामुळेच मी धाडसी पाऊस टाकले!; कांतारा चॅप्ट...
Special Interview : आईने मला नेहमीच प्रोत्साहन दिले, तिच्यामुळेच मी धाडसी पाऊस टाकले!; कांतारा चॅप्टर १ ची अभिनेत्री रुक्मिणी वसंतशी खास बातचित

अभिनेत्री रुक्मिणी वसंत सध्या कांतारा चॅप्टर १ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. ती या चित्रपटात नवीन आहे. विशेष मुलाखतीत तिने आयुष्यातील काही अज्ञात पैलू उघड केले. अशोक चक्र पुरस्कार विजेत्या शहीद वडिलांची आणि सामाजिक कार्यकर्त्या आईची ती मुलगी आहे. दक्षिणेत स्वतःचे नाव कमावल्यानंतर बॉलिवूडमध्ये सध्या ती धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाला मिळत असलेल्या यशामुळे ती प्रचंड उत्साहित आहे. तिच्या खासगी व व्यावसायिक आयुष्यावर तिने भाष्य केले.
रुक्मिणी : तो काळ खूप कठीण होता. माझ्या वडिलांना अशोक चक्राने सन्मानित करण्यात आल्याने मला खूप अभिमान वाटतो. सरकारने आणि समाजाने त्यांच्या शहीदत्वाचा खूप आदर केला आणि सर्वांनी आम्हाला खूप पाठिंबा दिला. पण एक मुलगी म्हणून वडील गमावण्याचे दुःख खूप खोल होते. त्यावेळी, माझी आई माझ्या आणि माझ्या धाकट्या बहिणीसाठी आधारस्तंभ ठरली. तिने आमचे सर्व प्रकारे रक्षण केले. तिने तिच्या प्रचंड दुःखाला शस्त्रात रूपांतरित केले आणि युद्धातील शहीदांच्या पत्नींसाठी वीर रत्न ही एक स्वयंसेवी संस्था स्थापन केली. माझे वडील एका बटालियनचे कमांडिंग ऑफिसर होते, त्यामुळे इतक्या वरिष्ठ पदावर असलेला कर्नल दहशतवादी हल्ल्यात युद्धभूमीवर नसतो. पण माझे वडील गेले, मात्र ते शहीद झाले. ही बाब माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली. त्या दुःखाच्या काळात माझ्या आईच्या समाजसेवेच्या भावनेने प्रचंड शक्ती आणि धैर्य दिले.
.jpg)
रुक्मिणी : माझ्या आईचा माझ्यावर खूप प्रभाव होता. माझी आई भरतनाट्यमची शिक्षिका आहे आणि मी भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेतले होते, पण मी बॅलेकडे जास्त कल ठेवत होते. जेव्हा मी तिला हे सांगितले तेव्हा तिने मला पाठिंबा दिला आणि मला प्रत्येक प्रकारे प्रोत्साहन दिले. तिने नेहमीच मला आनंद आणि समाधान देणारे क्षेत्र निवडण्याची परवानगी दिली. माझ्या पार्श्वभूमीमुळे अभिनय क्षेत्र निवडणे हे एक धाडसी पाऊल होते. अर्थात, माझ्या कुटुंबाला असे वाटत होते, की मी एक सुरक्षित क्षेत्र निवडावे. मात्र माझ्या आईने मला येथेही पाठिंबा दिला. ती प्रत्येक ऑडिशनला माझ्यासोबत होती. ती माझ्यासोबत संवादांचा सरावच करत नव्हती तर मला नृत्याच्या स्टेप्सदेखील शिकवत होती. त्यावेळी माझी बहीण देखील लहान होती.
प्रश्न : आज तू एक स्वावलंबी आणि खंबीर मुलगी बनली आहेस. तुझ्या आईला आनंदी करण्यासाठी तू काय करू शकतेस?
रुक्मिणी : माझी आई कधीही काहीही मागत नाही. तिला तिच्या आईसोबत म्हणजे माझ्या आजीसोबत वेळ घालवायला आवडते. सर्वात जास्त शांती आणि आनंद तिथे मिळतो. आजकाल ती तिच्या आईची आणि माझ्या धाकट्या बहिणीची काळजी घेण्यात खूप व्यस्त असते.
प्रश्न : सध्या महिला, मुलींना ज्या काही समस्या भेडसावतात, त्याबद्दल तुला वाटते?
रुक्मिणी : मला सर्वात जास्त त्रास देणारी गोष्ट म्हणजे मुलींना समान संधी मिळत नाहीत. प्रथम, मुलींना शिक्षणाच्या मूलभूत अधिकारापासून वंचित ठेवले जाते, जे खूप दुःखद आहे. ती तरुण होईपर्यंतसुद्धा बंधने तिच्यावर जास्त असतात. त्यातुलनेत मुलांना अशी कोणती बंधने नसतात. लग्नानंतरही एका दबावाखालीच वावरत असते. हुंड्यामुळे मुलींवर होणारा हिंसाचार आणि छळ देखील खूप त्रासदायक आहे. करिअरमध्येही तिला पुरुषांपेक्षा कमीच पगार मिळतो. वेतनातील तफावत कायम आहे. मग ती मुलगी पुरुषापेक्षा किती का जास्त आणि चांगले काम करेना.
प्रश्न : कांतारा चॅप्टर १ मध्ये नवीन एन्ट्री म्हणून तुला किती दबाव जाणवला?
रुक्मिणी : मी या टीममध्ये एक नवीन कलाकार होते. त्यामुळे सुरुवातीला काही चूक झाली का, ते माझ्यामुळे झाले आहे का याबद्दल दबाव होता. मला खूप भीती वाटत होती, परंतु आमच्या टीममधील कोणीही, ऋषभ (नायक-दिग्दर्शक ऋषभ शेट्टी) सरांसह किंवा कोणत्याही कलाकार आणि क्रूने माझ्यावर असा दबाव आणला नाही. टीमने या चित्रपटाला एक स्वतंत्र चित्रपट मानले. या चित्रपटात मी एका योद्धा राजकुमारीची भूमिका साकारत आहे. त्यामुळे चित्रपटात खूप अॅक्शन होते आणि मला अनेक वेळा दुखापत झाली. एकदा एका अॅक्शन सीन दरम्यान माझे नखही तुटला, जो खूप वेदनादायक होता. पण मला शूट करावे लागले. परिस्थिती काहीही असो, मी थांबले नाही.