सिल्लोड, फुलंब्री, पैठणचे उपनगराध्यक्ष निवडले, विठ्ठल सपकाळ, जमीर पठाण, तुषार पाटील यांचा विजय

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिल्लोडच्या उपनगराध्यक्षपदी शिंदे गटाचे विठ्ठल सपकाळ यांची निवड झाली असून, त्यांनी भाजपच्या रेखा गणेश भूमकर यांचा २३ मतांनी पराभव केला. फुलंब्रीच्या उपनगराध्यक्षपदी काँग्रेसच्या जमीर पठाण यांची निवड झाली. त्यांनी भाजपचे योगेश मिसाळ यांचा ७ मतांनी पराभव केला. पैठणच्या उपनगराध्यक्षपदी शिंदे गटाचे तुषार सूर्यभान पाटील यांची बिनविरोध निवड झाली.

सिल्लोडमध्ये नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्यासह नवीन २८ नगरसेवकांनी सोमवारी (१२ जानेवारी) सकाळी ११ ला विशेष सोहळ्यात पदग्रहण केले. आ. अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यानंतर उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्य निवडण्यात आले. उपनगराध्यक्षपदासाठी हात उंचावून मतदान घेण्यात आले. शिंदे गटाच्या नंदकिशोर सहारे, सागर जाधव, शेख बाबर बागवान यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

फुलंब्री नगरपंचायतीच्या सभागृहात नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांच्या उपस्थितीत उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्य निवडण्यात आले. त्यासाठी विशेष सभा घेण्यात आली. उपनगराध्यक्ष पदासाठी ३ अर्ज आले. भाजपकडून योगेश मिसाळ, तर महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे जमीर पठाण व हिना मुद्दसौर पटेल यांनी अर्ज दाखल केले होते. हिना पटेल यांनी अर्ज मागे घेतला. हात उंचावून मतदान घेण्यात आले. यात पठाण यांना १२, तर योगेश मिसाळ यांना ५ मते मिळाली. महाविकास आघाडीत नगराध्यक्ष पद ठाकरे गटाकडे गेल्याने उपनगराध्यक्ष पद काँग्रेसच्या वाट्याला आले आहे. भाजपचे मनोज मुळे यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाली.
पैठण नगरपरिषदेच्या सभागृहात नगराध्यक्ष विद्या कावसानकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. नगरपरिषदेवर शिंदे गटाची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे उपनगराध्यक्षपदासाठी केवळ तुषार पाटील यांचाच अर्ज आला. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मुख्य जलवाहिन्यांवरील १ हजारांहून अधिक अवैध नळ कनेक्शन तोडणार!; महापालिकेने मोहीम आखली, मुहूर्त कधी लागणार?

Latest News

मुख्य जलवाहिन्यांवरील १ हजारांहून अधिक अवैध नळ कनेक्शन तोडणार!; महापालिकेने मोहीम आखली, मुहूर्त कधी लागणार? मुख्य जलवाहिन्यांवरील १ हजारांहून अधिक अवैध नळ कनेक्शन तोडणार!; महापालिकेने मोहीम आखली, मुहूर्त कधी लागणार?
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : धरण उशाला अन्‌ कोरड घशाला ही म्हण दर उन्हाळ्यात छत्रपती संभाजीनगरकरांच्या बाबतीत खरी ठरते....
ऑर्केस्ट्रामध्ये काम, खासगी कंपनीत नोकरी... आयुष्याशी संघर्ष हरला २९ वर्षीय तरुण!; चौका घाटात घेतला गळफास, पैठण, वैजापूर तालुक्यातही मजूर, शेतकऱ्याची आत्महत्या
लाचखोर पोलीस अंमलदाराला ४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा!, छत्रपती संभाजीनगर सत्र न्यायालयाचा आदेश
८० वर्षांच्या वृद्धेवर ५४ वर्षांच्या पुरुषाचा लैंगिक अत्याचार, सोयगावची खळबळजनक घटना
Update : सुसाट कंटेनर बनला काळ!; ६ कामगारांना उडवले, ३ ठार, ३ जखमी, समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळील भीषण दुर्घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software