बहिणीच्या चुलत नणंदेची तरुणीकडून बदनामी!; इन्स्टाग्रामवर केले हे घाणेरडे कृत्य..., पैठण तालुक्यातील धक्कादायक प्रकार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

बिडकीन, ता. पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : बहिणीच्या चुलत नणंदेची तरुणीने इन्स्टाग्रामवर बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार पैठण तालुक्‍यात समोर आला आहे. बिडकीन पोलिसांनी २६ वर्षीय तरुणीविरुद्ध मंगळवारी (१४ ऑक्‍टोबर) गुन्हा दाखल केला आहे.

निकिता किरण लकारे (वय २६, रा. ठाणे) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणीचे नाव आहे. बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणाऱ्या २२ वर्षीय काजल (नाव बदलले आहे) हिने या प्रकरणात तक्रार दिली आहे. ती आई-वडील, बहिणीसह राहते. ती एम. एस्सी. केमिस्ट्रीच्या द्वितीय वर्षात छत्रपती संभाजीनगरच्या कॉलेजमध्ये शिकते. तिच्या चुलत भावाचे आणि त्याच्या पत्नीचे पटत नाही. त्यामुळे त्याची पत्नी माहेरी पैठणला राहते. चुलत भावाची २६ वर्षीय मेहुणी निकीता ठाणे येथे राहते. चुलत भाऊ आणि त्‍याच्या पत्नीत वाद असल्याने त्याची पत्नी आणि मेहुणी या काजल व तिच्या आई-वडिलांशी वाद घालत असतात.

शनिवारी (११ ऑक्‍टोबर) सकाळी आठच्या सुमारास काजल ही इन्स्टाग्रामवरील स्टोरी, पोस्ट व रिल्स बघत असताना निकिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काजलचा मित्रासोबत असलेला फोटो पोस्ट केला होता. ज्यामध्ये मित्राच्या चेहऱ्यावर कार्टूनचे स्टीकर लावले होते. त्यावर अश्लील मजकूर लिहिला. माझ्या नादी लागू नकोस, असे हे मेसेज घेऊन पोलीस स्टेशनला जा. तुझं काम होईल. मी पण वाट बघून आहे तुझी वाट लावायला, अशी धमकीही तिने पोस्टमध्ये दिली होती. काजलने तातडीने मोबाइलमध्ये ४ स्क्रीन शॉट काढले. त्यानंतर कुटुंबीसोबत येऊन बिडकीन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी निकिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक महादेव गोमारे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सिटी चौक परिसरातून २१ वर्षीय तरुणी बेपत्ता

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software