महापालिका स्थायी समिती सभापतिपदी अनिल मकरिये, आज औपचारिक निवड

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महापालिका स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपने अनिल मकरिये यांना बुधवारी (११ मार्च) उमेदवारी जाहीर केली आहे. ते समर्थनगर प्रभागाचे नगरसेवक आहेत. आज, १२ मार्चला निवडीची औपचारिक घोषणा होईल.

भाजप, शिंदे गटाचे स्थायी समितीत बहुमत आहे. भाजपचे कमलाबाई नरोटे, राजगौरव वानखेडे, सुरेंद्र कुलकर्णी, रवी कावडे, अनिल मकरिये, अर्चना नीळकंट, माधुरी अदवंत, अप्पासाहेब हिवाळे, एमआयएमचे खान अब्दुल मतीन, मेराज खान, पठाण मजहर, खान अल्मास खानम, शिंदे गटाचे श्वेता त्रिवेदी, राजू राजपूत, ठाकरे गटाचे सचिन खैरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अमित भुईगळ हे स्थायी समितीत सदस्य आहेत. एमआयएमने नगरसेवक खान अब्दुल मतीन यांना सभापतिपदाची उमेदवारी दिली आहे. आज १२ ला सकाळी ११ वाजता निवडणूक होईल. मकरिये यांचा अर्ज दाखल करताना महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, शहराध्यक्ष किशोर शितोळे यांची उपस्थिती होती. खान अब्दुल मतीन यांनी विरोधी पक्षनेता अब्दुल समीर यांच्यासह जाऊन अर्ज दाखल केला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

महापालिका स्थायी समिती सभापतिपदी अनिल मकरिये, आज औपचारिक निवड

Latest News

महापालिका स्थायी समिती सभापतिपदी अनिल मकरिये, आज औपचारिक निवड महापालिका स्थायी समिती सभापतिपदी अनिल मकरिये, आज औपचारिक निवड
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महापालिका स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपने अनिल मकरिये यांना बुधवारी (११ मार्च) उमेदवारी जाहीर...
अवघे छत्रपती संभाजीनगर शहरच ‘गॅस’वर!; घरगुती गॅसची कृत्रिम टंचाई, ९२१ रुपयांचा सिलिंडर २ हजार रुपयांनी विकताहेत विक्रेते, प्रशासनाचे दावे फोल, दावे करण्यापेक्षा आता थेट टीम बनवून छापे मारा... शहरवासियांची मागणी!!
हरिभाऊ बागडे यांच्या प्रकृतीत सुधारणा!; रुग्णालयातून डिस्चार्ज
१७ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील घटना
शाळेच्या आवारात १३ वर्षीय विद्यार्थिनीसोबत शिक्षकाचे अश्लील चाळे!; पैठणमधील प्रकाराने खळबळ
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software