पोलीस नाईक नानासाहेब दिवेकर यांची निर्घृण हत्या!; वैजापूर तालुक्यातील बळ्हेगावची खळबळजनक घटना, देवगाव रंगारी ठाण्यात होते कार्यरत, अनैतिक संबंधातून हत्या झाल्याचा संशय, तिघे चौकशीसाठी ताब्यात!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : देवगाव रंगारी (ता. कन्नड) पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक नानासाहेब रामजी दिवेकर (वय ४८, मूळ रा. बळ्हेगाव, ता. वैजापूर, ह. मु.  पडेगाव, छत्रपती संभाजीनगर) यांची मूळगावी बळ्हेगाव येथे निर्घृण हत्या करून घराशेजारीच मृतदेह पुरल्याची धक्कादायक घटना रविवारी (४ जानेवारी) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास समोर आली. या घटनेने जिल्ह्यातील पोलीस दलात खळबळ उडाली. सुरुवातीला भाऊबंदकीतून ही घटना घडल्याचा अंदाज वर्तविणाऱ्या पोलीस सूत्रांनी रात्री उशिरा अनैतिक संबंधातून हत्या घडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. शिऊर पोलिसांनी रात्री साडेनऊला खुनाचा गुन्हा दाखल करून ३ संशयित नातेवाइकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत त्यांची कसून चौकशी सुरू होती.

मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पाठविण्यात आला. नानासाहेब देवगाव रंगारीला पडेगाव येथून येजा करत होते. १ जानेवारीला ते कर्तव्यावर होते. कौटुंबिक वादामुळे त्यांची पत्नी ३ वर्षांपासून माहेरी राहते. मुलगा धुळे येथील पोलीस अकादमीत प्रशिक्षण घेत आहेत. नानासाहेब यांचे वृद्ध वडील रामाजी दिवेकर हे मूळगावी बळ्हेगावला राहत होते. नानासाहेब त्यांना भेटण्यासाठी १ जानेवारीला मूळगावी गेले. २ जानेवारीच्या सकाळपर्यंत ते संपर्कात होते. सोशल मीडियावरही सक्रिय होते. नंतर त्यांचा संपर्क तुटला. त्यांनी पोलीस ठाण्यात रजाही टाकलेली नव्हती.

दोन दिवस वडील घरी न परतल्याने आणि फोनही लागत नसल्याने त्यांच्या मुलाने बळ्हेगावच्या सरपंचांना कॉल केला. सरपंचांनी त्यांच्या गावातील घरी जाऊन भावबंदांकडे चौकशी केली. त्यावेळी नानासाहेब २ जानेवारीला आले होते. मात्र त्यानंतर कुठे गेले, याची माहिती नसल्याचे भावबंदांनी सांगितले. त्यानंतर त्यांच्या मुलाने शिऊर पोलिसांना कळवले. प्रकरण गंभीर असल्याने शिऊर पोलिसांनी रविवारी दुपारी बळ्हेगाव येथील घराची बारकाईने पाहणी केली. त्यावेळी दिवेकरांचा फ्‍लाइट मोडवर टाकलेला मोबाइल पलंगाखाली दिसला. घराशेजारील पडीक जागेत माती उकरलेली दिसली. त्यामुळे संशय वाढला.

पोलिसांनी तेथे खोदकाम केले असता सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मृतदेह बाहेर काढण्यात आला. घटनेची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे, सहायक पोलीस निरीक्षक वैभव रणखांब यांना मिळताच त्यांनीही घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिसांनी त्यांच्या भावबंदांचे जबाब नोंदवले असताना, जबाबात तफावत येत असल्याने तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. नानासाहेब यांची हत्या सुरुवातीला भावबंदकीतून झाल्याची चर्चा होती. नंतर अनैतिक संबंधातून हत्या झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली. पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

प्रियकराने केला २० वर्षीय तरुणीचा खून
सोलापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सोलापूरच्या रामवाडीतील रहिवासी २० वर्षीय स्नेहा श्रीकांत बनसोडे या तरुणीचा तिचा प्रियकर आदित्य रमेश चव्हाण (रा. नागूरतांडा, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) याने चाकूने गळा चिरून हत्या केली. ही घटना रविवारी (४ जानेवारी) सकाळी साडेदहाच्या सुमारास अक्कलकोट येथील बासलेगाव रोडवरील लोखंडे मंगल कार्यालयामागे घडली. स्‍नेहाची हत्‍या केल्यानंतर आदित्यने स्वतःवरही चाकूचे वार करून घेतल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.

sneha
स्‍नेहा आणि आदित्य

स्‍नेहाच्या आईचे माहेर मैंदर्गी (ता. अक्कलकोट) आहे. तिचे मामा मैंदर्गीत राहतात. याच गावाजवळ नागूरतांडा असून, तेथील आदित्यशी स्‍नेहाची ओळख झाल्यानंतर दोघांत प्रेमसंबंध निर्माण झाले. स्‍नेहाच्या घरच्यांनी तिला आदित्यसोबत संबंध ठेवण्यास मनाई केली होती. स्‍नेहाने प्रेमसंबंध पुढे नेण्यास नकार दिल्यानेच आदित्यने हत्या केल्याचा संशय आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मुकुंदवाडीच्या पोलीस अंमलदारावर हॉटेलमध्ये राड्याचा आरोप, मारहाणीसह चाकू हल्ल्यात चौघे जखमी, हॉटेलमालकानेच पकडून करमाड पोलिसांत नेले...

Latest News

मुकुंदवाडीच्या पोलीस अंमलदारावर हॉटेलमध्ये राड्याचा आरोप, मारहाणीसह चाकू हल्ल्यात चौघे जखमी, हॉटेलमालकानेच पकडून करमाड पोलिसांत नेले... मुकुंदवाडीच्या पोलीस अंमलदारावर हॉटेलमध्ये राड्याचा आरोप, मारहाणीसह चाकू हल्ल्यात चौघे जखमी, हॉटेलमालकानेच पकडून करमाड पोलिसांत नेले...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे अंमलदार नितेश जाधव यांच्यासह चौघांविरुद्ध हॉटेलमध्ये केलेल्या राड्याप्रकरणी करमाड पोलिसांनी मंगळवारी...
सिडको एन ३ भागात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले, महिलेने धरून ठेवल्याने १ तोळ्यापैकी ३ ग्रॅमचा भाग गेला...
अपघातानंतर फार्मसिस्टला दुचाकीस्वारांची मारहाण, मोबाइल हिसकावून पळाले... चिकलठाण्यातील घटना
भरधाव ट्रकने दुचाकीला मागून ठोकरले, दाम्‍पत्‍यासह चिमुकली जखमी, वाळूज MIDC तील घटना
रांजणगाव शेणपुंजीत एमआयडीसीच्या जागेवर पुतळा, झेंडा, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software