इतका क्लिष्ट गुन्हा, ३ जिल्हे अन्‌ ४८ तासांत उलगडा!; छत्रपती संभाजीनगरच्या LCB चं कौतुक करावं तितकं थोडं... पैठणच्या खुनाचा झाला उलगडा!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

क्राईम रिपोर्टर, मेट्रोपोलिस पोस्ट, मो. ९७६३५००६४५ (व्हॉट्‌स ॲप)
छत्रपती संभाजीनगर: गुन्हा इतका क्लिष्ट होता, की त्याच्या तपासात किती काळ जाईल, याची काहीही शाश्वती नव्हती. युवकाचा खून करून मृतदेह गोणीत बांधून पैठण तालुक्यातील पाटेगावच्या गोदावरी नदी पात्रात आणून टाकला होता... तो मृतदेह कुणाचा, कुणी आणि कशासाठी मारले, असे अनेक प्रश्न होते... या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या स्‍थानिक गुन्हे शाखेची टीम कामाला लागली. मृतदेह आढळला सोमवारी (१५ डिसेंबर) सकाळी ११ ला... पोलिसांनी मारेकरी निष्पन्न करून अटक केली, ते अवघ्या ४८ तासांत... विशेष म्हणजे खुनाचे धागेदोरे ३ जिल्ह्यांत फिरले. मृतदेह आढळला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात, मृतक निघाला अहिल्यानगर जिल्ह्यातील आणि मारेकरी निघाले बुलडाणा जिल्ह्यातील...

कृष्णा पंढरीनाथ धनवडे (वय ३०, रा. गदेवाडी, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर)  असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. सागर रामेश्वर केसापुरे (वय २०, रा. देऊळगाव राजा), ऋषिकेश सखाराम गायकवाड (वय २२, रा. दुधड, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) आणि एक विधीसंघर्ष बालक हे मारेकरी निष्पन्न झाले आहेत. सागर हा कृष्णाचा भाचेजावई लागतो. पोलीस मृतदेहाची ओळख पटवत असताना शेवगाव पोलिसांनी एका खुनाच्या आरोपीला सहज कृष्णाचे फोटो दाखवले. त्याने लगेचच त्याला ओळखले आणि तो गदेवाडीचा असल्याचे सांगितले. कृष्णा मूकबधिर होता. त्याचे आई-वडील वयस्कर आहेत. कृष्णाला दारूचे व्यसन होते. तो अनेकदा घरी न सांगता निघून जायचा. मूकबधिर असल्याने फोनही वापरत नव्हता. त्यामुळे त्याचे मारेकरी शोधायचे कसे, हे आव्हान पोलिसांसमोर होते.

कसोशीने तपास करत असताना पोलिसांना गोपनीय आणि तांत्रिक माहितीच्या आधारे  कळले, की हा गुन्हा सागर केसापुरे याने केला आहे. त्यांनी लगेचच त्याला ताब्यात घेतले. कसून चौकशीत त्याने साथीदारांचीही नावे सांगितली. १३ डिसेंबरला रात्री कृष्णाच्या घरी जाऊन तो झोपेत असतानाच सागर, ऋषिकेश आणि सागरच्या भावाने त्याला गळा आवळून जीवे मारले. नंतर हातपाय दोरीने बांधून प्लास्टिकच्या गोणीत भरून मोटारसायकलीने पाटेगावजवळ येत तिथल्या गोदापात्रात मृतदेह फेकून दिला.

आज, १९ डिसेंबरला कारवाईची माहिती पत्रकारांना देण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक पवन इंगळे, पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे, पोलीस अंमलदार विष्णू गायकवाड, शिवानंद बनगे, अशोक वाघ, अनिल काळे, महेश बिरूटे, सचिन राठोड, कासीम शेख, बलवीरसिंह बहुरे, संजय तांदळे, शिवाजी मगर, सुनील गोरे, नीलेश कुटे, योगेश तरमाळे, जीवन घोलप यांनी केली. अधिक तपास पैठण पोलीस ठाण्याचे निरीक्षक महादेव गोमारे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या

Latest News

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : केकत जळगाव (ता. पैठण) येथील अल्पभूधारक शेतकरी भास्कर बाबुराव मगर (वय ३५) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून...
प्रेम प्रकरणात मदत करत असल्याच्या संशयावरून तरुणावर लोखंडी रॉड, बेल्टने बेदम मारहाण, रोहिदासपुऱ्यातील घटना
दारूच्या नशेत मित्रानेच आवळला मित्राचा गळा!; खुनाचे गूढ २४ तासांत उकलले, बिडकीनजवळील पैठणखेड्याची घटना
Good News : शेंद्र्याजवळील जयपूर एमआयडीसीत महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनी १५० एकरवर साकारणार प्रकल्प!
बौद्ध समाजमंदिरावर चालवला जेसीबी!; पाडळसा उपसरपंचाचे कृत्य, गंगापूर तालुक्यातील खळबळजनक घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software