किरीट सोमय्यांवर सिल्लोडमध्ये हल्ला, चौघांना अटक, सोमय्या म्हणाले, मुस्लिम अतिरेक्यांनी माझ्यावर हल्ला केला!, यापूर्वी छ. संभाजीनगरच्या सिटी चौक पोलीस ठाण्यातही चाल करून आले होते MIM पदाधिकारी

On

सिल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरच्या सिटी चौक पोलीस ठाण्यात गेल्या १९ ऑगस्टला भाजप नेते किरीट सोमय्यांवर एमआयएमचे पदाधिकारी चालून गेले होते. त्‍यावेळी हल्ल्याचा प्रयत्‍न फसला, पण वचपा सोमवारी (१ सप्‍टेंबर) सिल्लोडमध्ये काढण्यात आला. सकाळी अकराला सोमय्यांची कार अडवून काळे झेंडे दाखवत हल्ला करण्यात आला. यामुळे सिल्लोड शहर पोलिसांनी एमआयएम, काँग्रेस, शिवसेनेच्या ४ जणांना अटक केली आहे.

जन्माचे कोणतेही पुरावे नसताना १, १०० जणांना प्रशासनाने बोगस जन्मप्रमाणपत्र दिल्याचा आरोप करून त्याचे पुरावे दाखल करण्यासाठी सोमय्या सिल्लोडला आले होते. या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेश कोल्हे, पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांनी सोमय्यांना वाचवत शिंदे गटाचे कार्यकर्ते शेख इम्रान शेख नजीर (वय ३८), काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अशपाक निसारखान पठाण (वय ३२), एमआयएमचे शहराध्यक्ष पठाण फईमखा मुनीरखा (वय ३७) व रफीक उस्मानशेख (वय ४५) आणि इतर अनोळखी दोन अशा ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

त्यानंतर अनोळखी दोन वगळता चौघांना अटक केली. पहिल्या टप्प्यात ज्या लोकांना सिल्लोड शहरात प्रशासनामार्फत पुरावे नसताना जन्म दाखले देण्यात आले, त्यांचे लेखी पुरावे दिले आहेत, प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. उपविभागीय अधिकारी कार्यालयाबाहेर मुस्लिम अतिरेक्यांनी माझ्यावर हल्ला केला. सीआयएसएफ कमांडोंनी त्यांना हुसकावले. माझ्यावर हल्ला करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणीही त्‍यांनी केली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

१५ दिवसांत डोळे चक्रावणारा नफा पाहून पैसे गुंतवत गेले, पण आता डोळे पांढरे होण्याची वेळ आली!; अडीच कोटींची फसवणूक, छ. संभाजीनगरच्या व्यावसायिकासह त्‍यांचे नातेवाइक, गावातील लोक फसले!!

Latest News

१५ दिवसांत डोळे चक्रावणारा नफा पाहून पैसे गुंतवत गेले, पण आता डोळे पांढरे होण्याची वेळ आली!; अडीच कोटींची फसवणूक, छ. संभाजीनगरच्या व्यावसायिकासह त्‍यांचे नातेवाइक, गावातील लोक फसले!! १५ दिवसांत डोळे चक्रावणारा नफा पाहून पैसे गुंतवत गेले, पण आता डोळे पांढरे होण्याची वेळ आली!; अडीच कोटींची फसवणूक, छ. संभाजीनगरच्या व्यावसायिकासह त्‍यांचे नातेवाइक, गावातील लोक फसले!!
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : १५ दिवसांत चक्रावून टाकणारा नफा हातात पडत होता... त्यामुळे एकाचे पाहून दुसऱ्याने, मग तिसऱ्याने अन्‌...
पिसादेवीत किराणा दुकान फोडून दीड लाखाचे साहित्य लंपास
टोमॅटो कापताय, चेहऱ्यावर एक तुकडा रगडून घ्या... सगळेच विचारतील ग्लोचे रहस्य
बी.एस्सी. नंतरच्या करिअरची काळजी आहे का?; फक्त डॉक्टर किंवा शास्त्रज्ञच नाही, तर हे ५ पर्याय तुमचे भविष्य उज्ज्वल बनवू शकतात!
पितृपक्ष ७ सप्टेंबरपासून!; या १५ दिवसांत चुकूनही करू नका ही ६ कामे
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software