गंगापूर तालुक्यात मतदारयादीत ३६ हजार दुबार नावे!; आ. आ. सतीश चव्हाण यांचा खळबळजनक आरोप

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : राज्यात ९६ लाख बोगस मतदार असल्याचा राग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आळवला असतानाच आता सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही (अजित पवार गट) राज यांच्या सुरात सूर मिसळला आहे. गंगापूर तालुक्याच्या मतदार यादीत तब्बल ३६ हजार मतदारांची नावे दोन किंवा अधिक वेळा असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांनी केला असून, ही नावे न वगळल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे.

गंगापूर तालुक्यात अनेक मतदारांची नावे दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा मतदार यादीत दिसत असून, याला बीएलओ जबाबदार असल्याचा आरोप आमदार चव्हाण यांनी केला. ते म्हणाले, की तालुक्यातील रांजणगाव शेणपुंजी येथे एक दोन नव्हे तर तब्बल दहा बोगस दत्तनगर आहेत. मतदारांचा पत्ता दत्तनगर दिसत असला तरी प्रत्यक्षात मतदार तिथे राहतच नाहीत. अनेक मतदारांची नावे दोन प्रभागांत आहेत. काहींची नावे ते राहत असलेला प्रभाग सोडून इतर प्रभागात दाखविण्यात आली आहेत.

मृत, स्थलांतर झालेल्यांची नावे अजूनही मतदार यादीत आहेत. अनेक मतदारांचा पत्ता एकच आहे. अनेकांच्या पत्त्यावर घर नंबर नाही. घर नंबर चुकीचे, घरांची नावे काल्पनिक असे प्रकारही यादी पाहिल्यावर दिसून येतात. ही केवळ गंगापूर तालुक्याची नव्हे तर जिल्हाभराची परिस्थिती आहे, असेही आमदार चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी पक्षाच्या जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष स्वाती कोल्हे, गंगापूर तालुकाध्यक्ष संजय जाधव, अनुराग शिंदे, सुभाष सोनवणे, योगिता महालकर आदींची उपस्थित होते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ

Latest News

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उसने घेतलेले पैसे परत देत नाही म्हणून तिघांनी मिळून स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून...
मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने चिमुकल्यावर चढवला हल्ला, चिमुकला आक्रोश करत असताना आणखी लचके तोडले, बायजीपुऱ्यातील घटनेने महापालिकेप्रती संतापाची लाट, जी. श्रीकांत पाठ थोपटून घेण्याऐवजी अधिकाऱ्यांना कामाला लावा, नागरिकांची अपेक्षा
छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी; गुरुवारपासून होणार प्रारंभ
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software