- News
- जिल्हा न्यूज
- कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्री : ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा
कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्री : ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट) : हंगाम सन २०२५-२६ मध्ये हमीभावाने कापूस व सोयाबीन, मका विक्री करण्यासाठी भारतीय कापूस निगम लिमिटेड यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पूर्व नोंदणी करण्यासाठी कापूस किसान मोबाइल अॅप्लिकेशन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सोयाबीन विक्रीसाठी ई समृद्धी ॲपवर तर मकाकरिता स्वतंत्र लिंकवर नोंदणीची सुविधा उपलब्ध असून, शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी ॲप सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.
छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, वैजापुर, खुलताबाद, कन्नड, सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री व संत ज्ञानेश्वर कृषी सेवा सहकारी संस्था अशा एकूण ९ ठिकाणी तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे सोयाबीन खरेदी केंद्र आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील किमान आधारभूत दरानुसार नोंदणी / NCCF मार्फत हंगाम २०२५-२६ करीता सोसायटी विक्रेत्यासाठी कृषि उत्पन्न बाजार समिती सिल्लोड व आकाश ॲग्रो शेतकरी उत्पादक कंपनी असे एकूण दोन ठिकाणी सोयाबीन नोंदणी सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, लासूर स्टेशन, वैजापुर, खुलदाबाद, कन्नड, सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री व संत ज्ञानेश्वर कृषी सेवा सहकारी संस्था, पाचोड व वीर महिला क्रांती शेतकरी कंपनी शिवना असे एकूण ११ ठिकाणी तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे मका खरेदी केंद्र आहेत. या ठिकाणी मका नोंदणी सुरू आहे. त्यासाठी शासनाने स्वतंत्र लिंक दिली आहे. https://mspbeam.in/accounts/signin या लिंकवर जाऊन शेतकऱ्यांनी आपल्या मका पिकाची नोंदणी करावी,असे आवाहन करण्यात आले आहे.
पूर्वनोंदणी करण्याचे आवाहन
हमीदराने कापूस विक्री करण्यासाठी भारतीय कपास निगम लिमिटेड यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पूर्व नोंदणी करण्यासाठी कपास किसान मोबाइल अॅप्लिकेशन तसेच सोसायटी नोंदणीसाठी ई-समृद्धी अॅपवर तसेच शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये ऑनलाइन नोंदणी आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी जवळच्या नोंदणीकृत खरेदी केंद्राशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

