६०० जणांना ६ कोटींचा गंडा घालणारा ‘साईबाबा'चा मुख्याधिकारी अखेर पोलिसांपुढे टाकल्या नांग्या; आला हात जोडत शरण 

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : वैजापूर शहरासह छत्रपती संभाजीनगर व अन्य तालुक्यांत साईबाबा महिला सहकारी पतसंस्थेच्या ६ शाखा आहेत. या शाखांमध्ये ६०० जणांच्या सुमारे ६ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. या ठेवीदारांना गंडा घालून फरारी झालेला साईबाबा महिला सहकारी पतसंस्थेचा मुख्याधिकारी (सिओ - चीफ ऑफिसर) गणेश रामहरी मोरे (वय ४५, रा. सुंदरनगर, पडेगाव, छत्रपती संभाजीनगर) याने अखेर पोलिसांपुढे नांग्या टाकल्या. तब्बल १०२ दिवस फरारी राहिल्यानंतर मोरे सोमवारी (६ ऑक्‍टोबर) पोलिसांना शरण आला. त्याला न्यायालयात उभे केले असता त्याला १४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणात पतसंस्थेची अध्यक्ष असलेली मोरेची पत्नी हिच्यासह आणखी १३ आरोपी मात्र अजूनही फरारी आहेत. 

वैजापूरच्या म्हसोबा चौकातील साईबाबा महिला सहकारी पतसंस्थेच्या वैजापूरसह छत्रपती संभाजीनगरच्या अन्य तालुक्यांत सहा शाखा आहेत. या शाखा पाच महिन्यांपूर्वी अचानक बंद झाल्या. यामुळे ठेवीदार गोंधळून गेले होते. अखेर पतसंस्थेचे पिग्मी एजंट कृष्णा धुळे यांच्या तक्रारीवरून वैजापूर शहर पोलिसांनी मोरे दाम्पत्यासह एकूण १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पतसंस्थेचा व्यवस्थापक रूस्तुम मतसागर याला पोलिसांनी लगेच अटक केली होती. पण मोरे व त्याचे अन्य १३ साथीदार २६ जूनपासून फरारी होते. पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखाही या प्रकरणाची चौकशी करीत आहे.

पोलीस आपल्या मागावर असून, आता आपली धडगत नाही हे लक्षात येताच अखेर गणेश मोरे सोमवारी स्वत:हून पोलिसांच्या पुढ्यात दाखल झाला. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयापुढे उभे केले. या प्रकरणात आतापर्यंत केवळ दोघेच पोलिसांच्या हाती लागले असून, अन्य १३ आरोपी अद्याप फरारी आहेत. यात पतसंस्थेची अध्यक्ष उषा गणेश मोरे, उपाध्यक्ष सुशीला राजेंद्र म्हस्के, सचिव गंगासागर अप्पासाहेब शेजवळ, संचालिका कविता विष्णू सुरडकर, सविता रामकिसन म्हस्के, सुजाता सतीश शेरखाने, सविता गोकुळ मोरे, मंजुश्री दगडू कावळे, गिता चंद्रकांत चव्हाण, कल्पना नरसिंग माळी, पूजा आदिनाथ नवले, पल्लवी किशोर आघाव, पार्वती गणेश रविवाले यांचा समावेश आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात दर मिनिटाला वाढताहेत फ्‍लॅटच्या किंमती

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software