फुलंब्री नगरपंचायतीची निवडणूक आता २० डिसेंबरला होणार, वैजापूर, गंगापूर, पैठणच्या ८ नगरसेवकपदाची निवडणूकही लांबली...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : फोडाफोडीमुळे गाजलेल्या फुलंब्री नगरपंचायतीच्या निवडणुकीत मोठा व्टिस्ट आला आहे. मतदानासाठी अवघा एक दिवस उरलेला असताना या नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. याचा मोठा आर्थिक फटका उमेदवारांना बसला आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ४ डिसेंबरला नव्याने फुलंब्रीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल. सायंकाळपर्यंत जिल्ह्याच्या निवडणूक विभागाला आयोगाकडून काहीही सूचना आलेल्या नव्हत्या. जिल्ह्यातील इतर नगरपालिकेच्या काही प्रभागांतील निवडणूक प्रक्रियाही स्थगित करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी ४ डिसेंबर रोजी नव्याने निवडणूक कार्यक्रम जारी करतील. १० डिसेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जातील. ११ डिसेंबरला निवडणूक चिन्ह वाटप होऊन २० डिसेंबर रोजी मतदान आणि २१ डिसेंबरला मतमोजणी होईल. गंगापूर पालिकेतील प्रभाग ६ आणि प्रभाग ४ मधील प्रत्येकी एकेका जागेची निवडणूक स्थगित झाली आहे. पैठण पालिकेतील प्रभाग ६ मधील २, प्रभाग ३ मधील १ आणि प्रभाग ११ मधील १ अशा चार जागांची निवडणूक स्थगिती झाली तर वैजापूरमधील प्रभाग १ मधील १ व प्रभाग २ मधील १ अशा २ जागांची निवडणूक स्थगित झाली आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पैसा, बाटली नंतर लोंढेंच्या खुनामागे ‘बाई’सुद्धा!, तिच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने विशालच्या डोक्यात सणक गेली, बंदुकीतून गोळी झाडली!!, छत्रपती संभाजीनगरातील हत्याकांडाला अनेक पदर...

Latest News

पैसा, बाटली नंतर लोंढेंच्या खुनामागे ‘बाई’सुद्धा!, तिच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने विशालच्या डोक्यात सणक गेली, बंदुकीतून गोळी झाडली!!, छत्रपती संभाजीनगरातील हत्याकांडाला अनेक पदर... पैसा, बाटली नंतर लोंढेंच्या खुनामागे ‘बाई’सुद्धा!, तिच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने विशालच्या डोक्यात सणक गेली, बंदुकीतून गोळी झाडली!!, छत्रपती संभाजीनगरातील हत्याकांडाला अनेक पदर...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सेवानिवृत्त प्राध्यापक राजाराम सुभराव लोंढे (वय ६०, रा. ज्योतीनगर) यांच्या हत्येच्या तपासात अनेक धक्कादायक...
एमजीएमजवळ अंधारात लपून बसले होते तिघे, पोलिसांना पाहून पळाले, अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला...
वाळूज एमआयडीसीतील ऑर्किड इंग्रजी शाळेला गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिली समज, नियमबाह्य फी वसूल करू नका!
‘तुमच्या मुलीला सुखात ठेवीन...’ प्रॉमिसवर सारिकाच्या आईने ठेवला विश्वास, प्रेमविवाहाला भरला होकार, सोपवला मुलीचा हात!; पण पुढे जे घडलं, ते धक्कादायक... छत्रपती संभाजीनगरच्या सिडकोची हृदयद्रावक घटना
अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software