इन्स्टाग्रामवर जरांगे यांची बदनामी केली, नंतर पोस्ट हटवली, तरुणाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल, वैजापूरची घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : मनोज जरांगे यांची बदनामी करणारी पोस्ट इन्स्टाग्रामवर टाकणाऱ्या तरुणाविरुद्ध वैजापूर पोलिसांनी शुक्रवारी (१७ ऑक्‍टोबर) गुन्हा दाखल केल आहे. त्याने पोस्ट टाकल्यानंतर डिलीट केली होती. मात्र गावातील २७ वर्षीय तरुणाने त्याचे स्क्रिनशॉट घेऊन पोलीस ठाणे गाठले.

संघपाल मच्छिंद्र शेजवळ (रा. जांबरगाव ता. वैजापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध अक्षय नंदकिशोर साठे (वय २७, रा. जांबरगाव, ता. वैजापूर) याने तक्रार दिली आहे. अक्षय मजुरी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. शुक्रवारी (१७ ऑक्‍टोबर) संध्याकाळी ७ ला अक्षय घरी असताना गावातीलच त्याचा मित्र सागर साठे याने त्याला कॉल करून सांगितले, की आपल्या गावातील संघपालने इन्स्टाग्रामवर मनोज जरांगे यांच्याबद्दल पोस्ट करून बदनामी केली आहे. सागरने त्या पोस्टचे स्क्रिनशॉट अक्षयला व्हॉट्‌स ॲपवर पाठवले. मनोज जरांगे यांना मोठ्या प्रमाणात सर्वच मराठा समाज मानत असून, या प्रकारामुळे समाजाच्या बांधवांचे मन दुखावलेले आहे. संघपालने ही पोस्ट इन्स्टाग्राम पेजवरून हटवली. मात्र त्याचे स्क्रिनशॉट सोबत जोडून अक्षयने पोलिसांत तक्रार दिली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मुकुंदवाडीच्या पोलीस अंमलदारावर हॉटेलमध्ये राड्याचा आरोप, मारहाणीसह चाकू हल्ल्यात चौघे जखमी, हॉटेलमालकानेच पकडून करमाड पोलिसांत नेले...

Latest News

मुकुंदवाडीच्या पोलीस अंमलदारावर हॉटेलमध्ये राड्याचा आरोप, मारहाणीसह चाकू हल्ल्यात चौघे जखमी, हॉटेलमालकानेच पकडून करमाड पोलिसांत नेले... मुकुंदवाडीच्या पोलीस अंमलदारावर हॉटेलमध्ये राड्याचा आरोप, मारहाणीसह चाकू हल्ल्यात चौघे जखमी, हॉटेलमालकानेच पकडून करमाड पोलिसांत नेले...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे अंमलदार नितेश जाधव यांच्यासह चौघांविरुद्ध हॉटेलमध्ये केलेल्या राड्याप्रकरणी करमाड पोलिसांनी मंगळवारी...
सिडको एन ३ भागात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले, महिलेने धरून ठेवल्याने १ तोळ्यापैकी ३ ग्रॅमचा भाग गेला...
अपघातानंतर फार्मसिस्टला दुचाकीस्वारांची मारहाण, मोबाइल हिसकावून पळाले... चिकलठाण्यातील घटना
भरधाव ट्रकने दुचाकीला मागून ठोकरले, दाम्‍पत्‍यासह चिमुकली जखमी, वाळूज MIDC तील घटना
रांजणगाव शेणपुंजीत एमआयडीसीच्या जागेवर पुतळा, झेंडा, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software