सिल्लोडच्या मुख्य बाजारपेठेत तुंबळ हाणामारीने तणाव, पोलिसांनी सौम्य लाठीमार करून पांगवला जमाव, बंदोबस्त वाढवला!

On
"छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूज' वेबसाईटवर प्रसिद्ध होणारा मजकूर, छायाचित्रे 'मेट्रोपोलिस पोस्ट' वृत्तपत्राच्या परवानगीशिवाय पूर्णतः किंवा अंशतः कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना कुणीही आढळल्यास कोणतीही वेगळी नोटीस न देता कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. - संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्र

सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : शाळेतील बेंचवर बसण्याच्या कारणावरून मुलांमध्ये किरकोळ वाद झाला. हा वाद मुलांनी घरी सांगितल्यानंतर दोन्ही मुलांचे कुटुंब भिडले. लाठ्या-काठ्या लोखंडी रॉडने तुंबळ हाणामारी झाली. मुख्य बाजारपेठेतच हा प्रकार घडल्याने आणि नक्की कशामुळे हा राडा होतोय हे कळत नसल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले. हाणामारीत तीन जण गंभीर जखमी झाले असून, सिल्लोड शहर पोलिसांनी दोन्ही गटांच्या तक्रारीवरून १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हाणामारीची माहिती पोलिसांना कळताच घटनास्‍थळी येऊन त्‍यांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला. ही घटना नीलम चौक ते भोकरदन रोडवरील मक्का मशीद परिसरात सोमवारी (१३ ऑक्‍टोबर) रात्री ८ च्या सुमारास घडली.

हाणामारीत अब्बुअनस पठाण, आवेसखा पठाण, रहिम रशीद सय्यद हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पहिल्या गटातील रशीदउमर सय्यद यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आवेसखा छोटेखा पठाण, आसेफखान छोटेखा पठाण, मजरखा छोटुखा पठाण, अकबर सांडू पठाण, फैय्याज सांडू पठाण, सलमान सिकंदर पठाण, परवेज तौसिफ पठाण, अनवर बहादूर पठाण, एजाज बहादूर पठाण (सर्व रा. सिल्लोड) या ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला तर, दुसऱ्या गटातील आवेसखा छोटेखा पठाण याच्या तक्रारीवरून साबेर अजीज कुरेशी, अक्रम युसूफ कुरेशी, जुनेद ताहेर कुरेशी, जावेद ताहेर कुरेशी, साजिद ताहेर कुरेशी, उमेर ताहेर कुरेशी आणि वाजिद कुरेशी (सर्व रा. स्नेहनगर, सिल्लोड) व इतर ३ ते ४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बी. एस. मुंढे करीत आहेत. पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला होता. दिवाळी सणानिमित्त बाजारपेठेत गर्दी असताना दोन जमाव भिडल्याने घबराट पसरली. अफवांमुळे पळापळही झाली. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. या भागात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सिडकोत टवाळखोरांचा कहर : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाला बेल्टने झोडपले, फायटरने मारले!

Latest News

सिडकोत टवाळखोरांचा कहर : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाला बेल्टने झोडपले, फायटरने मारले! सिडकोत टवाळखोरांचा कहर : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाला बेल्टने झोडपले, फायटरने मारले!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : सिडको एन ११ भागातील स्वामी विवेकानंदनगरात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या २० वर्षीय तरुणाला...
१७ वर्षीय मुलीचा मोबाइल स्विच्ड ऑफ येताच वडील शाळेत धावले, फूस लावून कुणीतरी पळवले!, किराडपुऱ्यातील घटना
छत्रपती संभाजीनगर जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची पंचसूत्री!; ६५१ बालकांना १४ नोव्हेंबरपर्यंत कुपोषणाच्या विळख्यातून बाहेर काढणार!!
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २६७ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना ‘एक हात मदतीचा’ ; गुरुवारपासून मिळणार मदत
विद्यापीठाकडून महाविद्यालयांना उद्यापासून ४ नोव्हेंबरपर्यंत सुट्टी, विद्यापीठ कॅम्प्‌सलाही २८ ऑक्‍टोबरपर्यंत सुट्टी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software