कन्‍नडमध्ये पुराचे २ बळी!; डेअरीत दूध देण्यासाठी जाणारा शेतकरी ‘अंजना’च्या प्रवाहात, तर ११ वर्षीय चिमुकला ‘शिवना’ नदीत गेला वाहून…

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

कन्‍नड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : टाकळी शाहू (ता. कन्‍नड) येथील शेतकरी साहेबराव नथ्थू दहीहंडे (वय ४८) हे अंजना नदीच्या पुरात वाहून गेले. त्यांचा मृतदेह सिल्लोड तालुक्यातील टाकळी खुर्द शिवारातील कोल्हापुरी बांधात मिळून आला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी (२३ सप्टेंबर) सकाळी ८ च्या सुमारास घडली. कन्‍नड शहराजवळील लंगोटी महादेव मंदिराजवळूनही मंगळवारी सकाळी ११ ला इरशान शेख खाजा (वय ११, रा. बिस्मिल्ला कॉलनी, कन्‍नड) हा मुलगा पाण्यात खेळताना वाहून गेला. तो आज, २४ सप्‍टेंबरच्या सकाळपर्यंतही मिळून आला नाही. त्याचा शोध सुरू आहे.

शेतकरी साहेबराव दहीहंडे त्यांच्या शेतातील राहत्या घरून दूध घेऊन गावातील डेअरीत देण्यासाठी सकाळी ८ ला जात होते. अंजना नदीवरील पुलावरून वाहणाऱ्या पाण्यातून ते डोक्यावर दुधाची कॅन घेऊन जात असताना पाण्याचा अंदाज न आल्याने प्रवाहात वाहून गेले. ग्रामस्थ व पोलिसांनी शोध सुरू केला. अडीच तासांनी मृतदेह आढळला. नाचनवेल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांकडे सोपविण्यात आला.

दुपारी तीनच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर शेतातच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व विवाहित मुलगी असा परिवार आहे. दुसऱ्या घटनेत इरशान हा काही मित्रांसह शिवना नदीपात्रात अंघोळीसाठी गेला होता. पाण्यात खेळताना तो वाहून गेला. मित्रांनी आरडाओरड केल्याने नागरिक धावून आले. नातेवाइकही आले. त्यांनी नदीपात्रात त्याचा शोध घेतला. मात्र तो मिळून आला नाही. कन्‍नड नगर परिषद, छत्रपती संभाजीनगरच्या अग्‍निशामक दलाकडून शोध घेण्यात येत आहे.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मुकुंदवाडीच्या पोलीस अंमलदारावर हॉटेलमध्ये राड्याचा आरोप, मारहाणीसह चाकू हल्ल्यात चौघे जखमी, हॉटेलमालकानेच पकडून करमाड पोलिसांत नेले...

Latest News

मुकुंदवाडीच्या पोलीस अंमलदारावर हॉटेलमध्ये राड्याचा आरोप, मारहाणीसह चाकू हल्ल्यात चौघे जखमी, हॉटेलमालकानेच पकडून करमाड पोलिसांत नेले... मुकुंदवाडीच्या पोलीस अंमलदारावर हॉटेलमध्ये राड्याचा आरोप, मारहाणीसह चाकू हल्ल्यात चौघे जखमी, हॉटेलमालकानेच पकडून करमाड पोलिसांत नेले...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे अंमलदार नितेश जाधव यांच्यासह चौघांविरुद्ध हॉटेलमध्ये केलेल्या राड्याप्रकरणी करमाड पोलिसांनी मंगळवारी...
सिडको एन ३ भागात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले, महिलेने धरून ठेवल्याने १ तोळ्यापैकी ३ ग्रॅमचा भाग गेला...
अपघातानंतर फार्मसिस्टला दुचाकीस्वारांची मारहाण, मोबाइल हिसकावून पळाले... चिकलठाण्यातील घटना
भरधाव ट्रकने दुचाकीला मागून ठोकरले, दाम्‍पत्‍यासह चिमुकली जखमी, वाळूज MIDC तील घटना
रांजणगाव शेणपुंजीत एमआयडीसीच्या जागेवर पुतळा, झेंडा, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software