गंगापूर, वैजापूरमध्ये २ भीषण अपघात; २ तरुणांचा जागीच मृत्यू, ३ गंभीर जखमी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : छत्रपती संभाजीनगरमध्ये अपघातांची मालिका थांबायला तयार नाही. जिल्ह्यात सोमवारी (१३ ऑक्‍टोबर) आणखी दोन अपघातांनी दोन तरुणांचा बळी घेतला आहे. यातील एक तरुण दिवाळीसाठी फटाके आणायला तर दुसरा नातेवाईकांना भेटण्यासाठी निघाला होता. हे अपघात गंगापूर आणि वैजापूर तालुक्यातील भटाणा येथे घडले.

राज चेतन चव्हाण (वय २२, रा. शहानूरवाडी परिसर, छत्रपती संभाजीनगर) आणि आदित्य अप्पासाहेब मगर (वय १९, रा. कोल्ही, ता. वैजापूर) अशी मृत्‍यू झालेल्यांची नावे आहेत. पहिल्या घटनेत राज चव्हाण आणि त्याचे मित्र सुमित साळुंके (वय २१) आणि सोहन आहेरकर (वय २१) सोमवारी फटाके खरेदीसाठी गंगापूरला गेले होते. परतताना रात्री साडेदहाच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर - अहिल्यानगर मार्गावर पेंडापूर फाट्यावर त्यांच्या कारचे टायर फुटले. यामुळे कारने चार पलट्या खाल्ल्या. तीनही तरुण गंभीर जखमी झाले. नागरिकांनी तिघांनाही छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिथे डॉक्टरांनी राजला मृत घोषित केले. इतर दोघांवर उपचार सुरू आहेत. गंगापूर पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली आहे.

दुसरा अपघात वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला ते कन्नड मार्गावरील भटाणा गावाजवळ सोमवारी रात्री साडेआठला कोल्ही येथील आदित्य मगर मित्रासह दुचाकीने बोलठाण येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी निघाला होता. समोरून येणाऱ्या पाण्याच्या टँकरने त्याच्या दुचाकीला धडक दिली. यात आदित्य जागीच ठार झाला, तर त्याचा मित्र ओम जनार्दन बोरसे (वय २०, रा. बोलठाण) गंभीर जखमी झाला. ओमवर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

एमजीएमजवळ अंधारात लपून बसले होते तिघे, पोलिसांना पाहून पळाले, अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला...

Latest News

एमजीएमजवळ अंधारात लपून बसले होते तिघे, पोलिसांना पाहून पळाले, अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला... एमजीएमजवळ अंधारात लपून बसले होते तिघे, पोलिसांना पाहून पळाले, अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : एमजीएमजवळ अंधारात लपून बसलेल्या तिघांनी पोलिसांना पाहून पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले...
वाळूज एमआयडीसीतील ऑर्किड इंग्रजी शाळेला गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिली समज, नियमबाह्य फी वसूल करू नका!
‘तुमच्या मुलीला सुखात ठेवीन...’ प्रॉमिसवर सारिकाच्या आईने ठेवला विश्वास, प्रेमविवाहाला भरला होकार, सोपवला मुलीचा हात!; पण पुढे जे घडलं, ते धक्कादायक... छत्रपती संभाजीनगरच्या सिडकोची हृदयद्रावक घटना
अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software